Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंडला संपवलं 'धुरंधर' स्टाईलने.

पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंडला संपवलं 'धुरंधर' स्टाईलने.

राची (पाकिस्तान) : 2019 च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मानला जाणारा दहशतवादी हमजा बुरहान याला पाकिस्तानमध्ये अज्ञात व्यक्तीने गोळ्या घालून ठार केले आहे. मुजफ्फराबाद येथे हा हल्ला झाला.

गोळीबारात हमजा बुरहानचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ‘धुरंधर’ स्टाईलने मर्डर झाल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.

हमजा बुरहान हा त्या वेळी मुजफ्फराबादमधील आपल्या कार्यालयात बसला होता. याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर अचानक गोळीबार केला. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हमजा बुरहान हा 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या कटकारस्थानात सहभागी असल्याचे मानले जात होते. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला होता. या भीषण हल्ल्यात 40 हून अधिक जवान हुतात्मा झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

दरम्यान, हमजा बुरहान पाकिस्तानमध्ये स्वतःला शिक्षक असल्याचे सांगत होता. मात्र 2019 नंतर तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचा आरोप होता. पाकव्याप्त काश्मीरमधील विविध भागांत तो दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण देत होता. तसेच सीमावर्ती भागातून दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्यातही त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने मोठी कारवाई करत 'ऑपरेशन बालाकोट' राबवले होते. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट परिसरात घुसून दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. या कारवाईत अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा भारताने केला होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka