*कुंचेली येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन व ग्रंथ प्रदर्शन उत्साहात*
*कुंचेली, ता. नायगाव, दि. १५ ऑक्टोबर २०२६ -*
आज दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री छत्रपती सार्वजनिक वाचनालय कुंचेली ता. नायगाव जि. नांदेड येथे दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त "वाचन प्रेरणा दिन" व भव्य ग्रंथ प्रदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला जि. प. प्रा. शाळा कुंचेलीचे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस श्री चंपतराव डाकोरे पाटिल व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी श्री चंपतराव डाकोरे व श्री गणेश मुरे सी. जी. सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनाचे महत्त्व विशद केले. "वाचाल तर वाचाल" ही उक्ती आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. वाचनालयातील ग्रंथ प्रदर्शनात विविध विषयांवरील पुस्तके मांडण्यात आली होती. त्यानंतर वाचनालयातील पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीची पुस्तके वाचनात गुंग होऊन वाचनाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाचे आभार श्री पंडीत जोंभळे सर यांनी मानले. "वंदे मातरम्" या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.या प्रसंगी जि. प. प्रा. शाळेचे कर्मचारी, गावातील नागरिक गणेश पाटिल बावलगावे, वीरभद्र पा. खैरके अशोकयाव भुरे, शाळेचे कृषिक्षेत्रात गणेश मुरे, चांबळे सर, जी. जी. सर, चंपतराव डाकोरे, संभाजी जिरते, नारायण गायकवाड , विद्यार्थी नागरिक ऊफस्थित होते.