Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Policewalaa News 1 year ago
राजे छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती विशेष...!

.नरेन्द्र कोवे सर/वडकी/यवतमाळ

शब्द पडतील अपुरे
अशी शिवबांची कीर्ती
राजा शोभूनी दिसे जगती ,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती !

जातीधर्माच्या भिंती भेदून माणसांत माणुसकीने जगायला शिकविणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !
महाराजांनी काटेकोरपणे सर्व धर्म संमभावाचे पालन केले. महाराज हे धर्मिकवृत्तीचे होते पण कर्मकांडावर मुळातच विश्वास नव्हता.
महाराजांनी 350 किल्ले बांधले परंतु एकाही किल्ल्यावर सत्यनारायणाची पूजा घातली नाही. पण शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधल्या त्याचे पुरावे आजही सरकार दरबारी व गडावरती उपलब्ध आहेत.
त्यांनी कधीही भविष्य, पंचांग पाहिले नाही.
मुहूर्त पाहिला नाही किंवा तिथी देखील पाहिली नाही. प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस महत्वाचा मानला.
वैदिक ब्राम्हणी धर्मशास्त्रीय तिथीप्रमाणे शिवजयंतीची तारीख सतत बदलत राहते. शासनाने संशोधन करून 2001 मध्ये अध्यादेश काढून 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख निश्चित केली आहे.
तेव्हा शिवप्रेमी यांना विनंती की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दोन जयंत्या करून राजांची थट्टा थांबवावी आणि जगमान्य असलेल्या नुसार तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करावी जेणेकरून शिवजयंती जगभरात साजरी केल्या जाईल.
मूलनिवासी बहुजन समाजाच्या स्वातंत्र्याचे जनक कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिन शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
आणि महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा !
Dailyhunt
Disclaimer: This content has been published by the user directly on Dailyhunt, an intermediary platform. Dailyhunt has neither reviewed nor has knowledge of such content. Publisher: Policewalaa News