यंदाच्या आयपीव्हीआरएस २०२५ जागतिक परिषदेत एनआयओ सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स दोन सर्वोच्च पुरस्कारांचे मानकरी !!
डोळ्यांच्या पडद्यांच्या उपचारासंबंधी तसेच शस्त्रक्रियांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पुण्यातील एनआयओ सुपर-स्पेशलिटी रुग्णालयातील नेत्ररोगतज्ज्ञांचा जागतिक व्यासपीठावर सन्मान.
पुणे – देशभरात डोळ्यांच्या उपचारांसाठी अग्रगण्य रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणा-या पुणे येथील एनआयओ सुपर-स्पेशलिटी हॉस्पिटलच्या शिरेत आता मानाचा तुरा रोवला गेला आहे. फिलिपीन्स या देशात पार पडलेल्या १८ व्या एशिया-पॅसिफिक विट्रीओ-रेटिना सोसायटी (आयपीव्हीआरएस) या वार्षिक परिषद २०२५ या सोहळ्यात एनआयओ सुपर-स्पेशलिटी हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांना सन्मानित करण्यात आले.

मनिला या शहरात हा पुरस्कार सोहळा थाटामाटात पार पडला. रुग्णालयाचे संचालक डॉ. आदित्य केळकर आणि डॉ. मौनिका बॉलिसेट्टी तसेच रुग्णालयातील विट्रेओ रेटिना स्पेशलिस्ट यांना रेटिना विज्ञानाच्या प्रगतीसाठी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी तसेच अत्याधुनिक नेत्र शस्त्रक्रियेतील मिळालेल्या प्राविण्यामुळे दोन महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही दखल घेतली गेल्याने रुग्णालयासाठी ही भूषणावह बाब ठरली आहे.
कर्करोगावरील उपचारांशी संबंधित कॅमोथेरपीचे उपचार घेतल्यानंतर रुग्णांना रुग्णांच्या डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते. डोळ्यांच्या कार्यपद्धतीत अडथळा निर्माण करणा-या या रेटिनल व्हेस्क्युलेटर या दुर्मिळ आजारावर डॉ. बोलीसेट्टी संबंधित रुग्णावर यशस्वी उपचार दिले. अशा गुंतागुतीच्या समस्येचे व्यवस्थापन केल्याने आयपीव्हीआरएस २०२५ या वार्षिक परिषदेत डॉ. बोलीसेट्टी यांना जागतिक सन्मानाचा सर्वोत्कृष्ट ई-पोस्टर पुरस्कार लाभला. डोळ्यांतील उपचारांत आता नवनवीन तंत्रज्ञान वापरले जात आहे. डॉ. केळकर यांनी डोळ्यांमधील फाटलेल्या पडद्याच्या उपचारांसाठी आगळीवेगळी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत गर्भाशयातील प्लेसेंटावरील आतल्या पातळ पडद्याचा वापर केला गेला तसेच रुग्णाच्या डोळ्यातील रेटिनल ऊतींचा (ऑटोलॉगस रेटिनल टिश्यू) वापर करुन त्याचे डोळ्यावर रोपण केले गेले.

डॉ केळकर यांनी अतिशय गुंतागुंतीची आव्हानात्मक शस्त्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने यशस्वी करुन दाखवली. व्हिडिओच्या माध्यमातून या शस्रक्रियेचे दस्तावेजीकरण करण्यात आले होते. या अभूतपूर्व योगदानाकरिता डॉ. केळकर यांनी १८व्या आयपीव्हीआरआस वार्षिक परिषदेत सर्वोत्कृष्ट शस्त्रक्रिया व्हिडिओ पुरस्काराचा सन्मान पटकावला. डॉ. केळकर यांचे कार्य त्यांची वैज्ञानिक शस्त्रक्रियेतील निपुणता आणि अचूकता दर्शवते.
डॉ. बोलिसेट्टी म्हणाल्या, ‘‘आमच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली. आम्हां सर्वांना हा पुरस्कार मिळाल्याचा सार्थ अभिमान आहे.’’
डोळ्यांशी संबंधित गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या व्हिडिओला जागतिक सन्मान मिळाल्याबदद्ल डॉ. केळकर यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘रुग्णाच्या डोळ्यांतील फाटलेल्या पडद्याची शस्रक्रिया करणे हे प्रत्येक सर्जनसाठी गुंतागुतींचे आणि आव्हानात्मक कार्य मानले जाते. हे आव्हान जगभरातील डोळ्यांच्या पदड्याचे तज्ज्ञ वेगवेळ्या कसोशीने पेलतात. सर्वात अगोदर आम्ही आमच्या शस्त्रक्रिया प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. डोळ्यांचा पडदा फाटल्याची तक्रार घेत दाखल झालेल्या दोन रुग्णांवर दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

द फिलीपिन्स अकॅडमी ऑफ ऑप्थ्रेमॉलोजी (पीएओ) आणि विट्रेओ रेटिना सोसायटी ऑफ द फिलिपाईन्स (व्हीआरपीएस) या नामांकित संस्थाकडून यंदाच्या ‘द आयपीव्हीआरएस २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत तब्बल ४५ देशांतील ३ हजार नेत्ररोगतज्ज्ञांनी सहभाग नोंदवला. यंदा ‘रेटिना ३६०- लर्निंग, एप्लिकेशन, ट्रान्सफॉर्मेशन, सिनर्जी’ या संकल्पनेवर सहभागी तज्ज्ञांनी आपापली मते मांडली. यात नावीन्यपूर्ण वैज्ञानिक आविष्कारांबाबत चर्चा करण्यात आली. आशिया-पॅसिफिक भूभागांतील माणसांच्या डोळ्यांतील पडद्याच्या आजार याबाबत तज्ज्ञांनी आपापली मते मांडली. डोळ्यांच्या पडद्याच्या योग्य उपचारांसंबंधीत योजनात्मक कार्यपद्धती, संशोधनात्मक कार्य आदी घटकांबाबतही चर्चा झाली. या पुरस्कारासाठी आयोजनकर्त्यांना विविध देशांतून १ हजार अर्ज प्राप्त झाले होते. विजेत्यांच्या निवडीसाठी नियुक्त समिती सदस्यांनी एनआयओ सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांची पुरस्काराकरिता निवड केली.