एनआयओ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने अधिक वेळ स्क्रिनवर व्यतित केल्यामुळे डोळे कोरडे होण्याच्या वाढत्या केसेसना प्रकाशझोतात आणले
ड्राय आय सिंड्रोमची तक्रार करणारे ४६ टक्के रूग्ण २५ ते ५६ वर्ष वयोगटातील आयटी प्रोफेशनल्स आहेत
पुणे: एनआयओ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ऑफ्थल्मोलॉजी सेवा देणाऱ्या सर्वात प्रतिष्ठित व प्रख्यात संस्थेने नुकतेच पुण्यातील रूग्णांमध्ये केलेल्या सर्वेक्षणामधून निष्पतींना जारी केले. ६ महिन्यांच्या कालावधीत ३००० रूग्णांमध्ये करण्यात आलेल्या या सर्वसमावेशक सर्वेक्षणाच्या निष्पत्तींमधून निदर्शनास आले की, ड्राय आय केसेससाठी स्क्रिनवर अधिक वेळ व्यतित करणे प्रमुख कारण होते, ज्याला कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (सीव्हीएस) म्हणतात.

ड्राय आय लक्षणे असलेली अधिकाधिक रूग्ण अधिक वेळ स्क्रिनवर व्यतित करत होते, जेथे सरासरी वेळ प्रतिदिन ६.३ तास ते ८.३ तास होता. लक्षणे आढळून आलेले ४६ टक्के रूग्ण २५ ते ५६ वर्ष वयोगटातील आयटी प्रोफेशनल्स होते, ज्यानंतर विद्यार्थी (१९ टक्के) आणि २६ ते ४५ वर्ष वयोगटातील ऑफिस कर्मचारी (११ टक्के) यांचा क्रमांक होता. या सर्वेक्षणामधून निदर्शनास आले की, १० टक्के रूग्ण ३५ ते ७० वर्षे वयोगटातील गृहिणी होत्या आणि ८ टक्के रूग्ण ६८ ते ७५ वर्ष वयोगटातील निवृत्त व्यक्ती होत्या. या वयोगातील रूग्ण सरासरी प्रतिदिन जवळपास ४.६ तासांपर्यंत स्क्रिनवर वेळ व्यतित करत होते.
या सर्वेक्षणाच्या निष्पत्तींबाबत मत व्यक्त करत एनआयओ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. आदित्य केळकर म्हणाले, ''या आकडेवारींमधून डिजिटल डिवाईसेसचा आपल्या डोळ्यांवर पडणारा ताण दिसून येतो. ड्राय आय आता फक्त वृद्धांमध्ये आढळून येणारी स्थिती राहिलेली नाही. अधिकाधिक तरूणांमध्ये, विशेषत: तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये या केसेस सर्वाधिक दिसून येत आहेत. एनआयओमध्ये आमच्या निदर्शनास आले आहे की, ४० ते ५० हून अधिक रूग्ण दररोज सीव्हीएस संबंधित ड्राय आय लक्षणांसाठी दररोज हॉस्पिटलमध्ये येतात. म्हणून, लक्षणांवर उपचार करण्यासोबत व्यक्तींच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणण्याला देखील चालना दिली पाहिजे. रूग्णांना माहिती देण्याचा सुरू असलेला उपक्रम आणि डिजिटल वेलनेस सल्ल्याच्या माध्यमातून आमच्या हॉस्पिटलमध्ये आमचा व्यक्तींना डोळ्यांवरील ताण कमी करण्यास आणि दीर्घकाळपर्यंत डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास सक्रिय पावले उचलण्यासाठी सक्षम करण्याचा मनसुबा आहे.''
सर्वेक्षण करण्यात आलेल्या सर्व ड्राय आय रूग्णांपेक्षा ८९ टक्के रूग्णांना ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप्सची आवश्यकता होती, ज्या सर्वांना २०-२०-२० नियमाची शिफारस करण्यात आली, म्हणजेच दर २० मिनिटांनी २० सेकदांचा ब्रेक घेऊन २० फूट लांब काहीतरी पाहणे आणि स्क्रिनवर व्यतित केला जाणारा अधिक वेळ कमी करणे.
या सर्वेक्षणामधून जीवनशैलींमध्ये बदल करण्यााची आणि अनियमित स्क्रिन वापराच्या धोक्यांबाबत जनजागृती वाढवण्याची त्वरित गरज निदर्शनास आली. ही बाब लक्षात घेत एनआयओ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने नुकतेच जागरूकता मोहिम #BlinkOkPlease लाँच केली. या मोहिमेचा भाग म्हणून हॉस्पिटल रूग्णांना त्यांच्या दैनंदिन क्रियाकलापांमध्ये स्क्रिनवर व्यतित केला जाणारा वेळ कमी करण्यास मदत करण्यासाठी जागरूकता सेमिनार्स, स्क्रिन फ्री झोन्स आणि अवेअरनेस वॉकेथॉन्स असे विविध उपक्रम राबवत आहे.