Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
12 सप्टेंबर 2026 : धनु राशीच्या लोकांना गुंतवणुकीसाठी मार्ग सापडेल

12 सप्टेंबर 2026 : धनु राशीच्या लोकांना गुंतवणुकीसाठी मार्ग सापडेल

मेष - प्रलंबित काम पूर्णत्वास जाईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मोलाचे ठरेल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा . वृषभ - आपल्या ध्येयावर अटळ राहा. नवीन ओळख उपयुक्त ठरेल. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका.

योग्य संधीसाठी वेळ द्या.
मिथुन - भावनेच्या आहारी न जाता व्यावहारिक निर्णय घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती कराल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल.
कर्क - तुमचे महत्त्व वाढेल. आपणास मान-सन्मान मिळेल. कला-क्रीडा स्पर्धेत यशस्वी व्हाल. आपल्यामुळे इतरांची गैरसोय टाळावी.
सिंह - तुमच्या कार्याला योग्य गती मिळेल. अतिअपेक्षा बाळगू नका. मानसिक समतोल साधावा. कोणतेही साहस करताना सतर्क राहावे.
कन्या - वैवाहिक जीवन आनंदी असेल. व्यवसायात प्रगती करता येईल. हट्टीपणाचा कळस करू नका. कधीही दुसर्‍याला कमी लेखू नका.
तूळ - जोडीदाराच्या सल्ल्याने कृती कराल. आपला बौद्धिक कस लागू शकतो. जवळच्या प्रवासाचा योग येईल. कामाचा व्याप वाढू शकतो.
वृश्चिक - जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. मेहनतीचे चीज होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आळस करू नका. आहारावर नियंत्रण ठेवा.
धनु - गुंतवणुकीसाठी मार्ग सापडेल. आवडीनिवडीबाबत आग्रही राहाल. ओळखी होतील. वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका.
मकर - घरासाठी खरेदी कराल. प्रवासात आरोग्याची काळजी घ्या. गैरसमजुती मनातून काढाव्यात. खर्चाचा ताळमेळ बसवावा लागेल.
कुंभ - उत्तम वैचारिक भूमिका घ्याल. आशावादी दृष्टिकोन कायम ठेवाल. नवीन शिकण्याची संधी सोडू नका. आपले मन अस्थिर होईल.
मीन - कला-क्रीडा-साहित्यात मोठे यश मिळेल. नव्या ओळखीच्या सहवासाने उत्साह वाढेल. आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar