Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
31 जुलै 2026 : या राशीच्या लोकांनी भविष्याचे निर्णय घेताना कुटुंबातील व्यक्तींना विश्वासात घ्यावे

31 जुलै 2026 : या राशीच्या लोकांनी भविष्याचे निर्णय घेताना कुटुंबातील व्यक्तींना विश्वासात घ्यावे

मेष : राजकीय-सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येईल. धंद्यात जोखीम आहे. बोलताना तारतम्य बाळगा. वृषभ : धंद्यात प्रगती करण्याची संधी मिळेल. आजाराकडे दुर्लक्ष करणे महागात पडेल.

दिवसातून थोडा वेळ तरी मुलांना द्या.
मिथुन : पार्ट्या, कार्यक्रम, गावजेवणावरचा खर्च टाळावा. मुलांनाही आर्थिक शिस्तीचे महत्त्व सांगावे. दररोज थोडेफार चालण्याची सवय ठेवा.
कर्क : भपकेबाजपणाच्या मागे लागून जमा असलेली पूंजी वाया घालवू नये. मोठ्या अवकाशानंतर संधी चालून येईल.
सिंह: भविष्याचे निर्णय घेताना कुटुंबातील व्यक्तींना विश्वासात घ्या. महत्त्वाचे धोरण ठरवता येईल. धंद्यात जम बसेल.
कन्या : तुमच्या कार्याचे, स्वभावाचे कौतुक होईल. चांगला सहवास लाभेल. उत्तम मार्गदर्शनाने जीवनाला कलाटणी मिळेल.
तूळ : तणाव कमी होऊ शकेल. वाहनाचा वेग मर्यादित ठेवा. प्रवास करताना सावधगिरी बाळगा. सहलीत नियमांचे पालन करा.
वृश्चिक: ठरविलेले काम करण्यात अडथळे येतील. तुम्ही जिद्द ठेवा. विरोध सहन करावा लागेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
धनुः महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेता येईल. धंद्यातील समस्या वेळीच सोडवा. पदाधिकाराचा वापर करता येईल.
मकर : लोक आपल्या चांगुलपणाचा फायदा उठवतील. तुम्ही व्यक्तीला नीट पटवून घ्या. स्वत: निर्णय घेण्याची क्षमता विकसित करा.
कुंभ : कोणताही प्रश्न जास्त रेंगाळत ठेऊ नका. विचारपूर्वक गुंतवणूक करा. भुलथापांना बळी पडू नका. स्वास्थ्य जपा.
मीन: घर, जमीन खरेदी करण्याचा विचार कराल. आप्तेष्ठांची मदत मिळेल. शिक्षण क्षेत्रात मुलांची प्रगती होईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar