Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अज्ञात वाहनाच्या धडकेत 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

सई : विरार पूर्वेकडील गडगापाडा येथील रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत 55 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

महादेव रत्ना चौरे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते विरारमधील कातकरीपाडा परिसरातील रहिवासी होते. गुरुवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ते गडगापाडा येथील रेल्वे उड्डाणपुलावरून जात असताना विरारकडून महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. अज्ञात वाहनाने चौरे यांना जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती की, चौरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच उड्डाणपुलावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, तसेच धडक देणारे वाहन कोणते होते, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar