नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पाचपावली परिसरात सिंधू महाविद्यालयाला भेट देत मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या सदस्य मोहिमेचा आढावा घेतला.
त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर आणि खासकरून भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलं आहे आणि ते त्यांचे काम उत्तम प्रकारे करत आहेत, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली. तसेच अमित साटम म्हणजे लोकांच्या मृत्यूवर हसणार माणूस, झाड पडून, खड्ड्यात पडून लोकांचे मृत्यू झाले त्यावर हसलेसा माणूस माझा मुलगा कुठल्या शाळेत जायला हे ठरवणार का? असा सवाल अमित ठाकरे यांनी केला. amit thackeray nagpur tour news
भाजप आमदार अमित साटम यांनी मराठी भाषेवरुन राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांनी त्यांच्या नातवाला म्हणजेच अमित ठाकरे यांच्या मुलाला बालमोहन विद्यालयात प्रवेश घ्यावा आणि मग टीका करावी, असे आव्हान अमित साटम यांनी दिले होते. त्यावरून अमित साटम यांनी सडेतोड उत्तर साटम यांना दिले आहे. अमित साटमांना भुंकायला ठेवलेले आहे. अशा लोकांवर काय बोलायचे. ज्यांना त्यांच्या मातृभाषेचे, राज्याचे काहीच पडलेले नाही. हे तेच आहे जे लोकांच्या मृत्यूवर हसले होते. अशी रोखठोक टीका अमित साटम यांच्यावर केली.
यावेळी अमित ठाकरे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही वक्तव्य केले. सरकारला विद्यार्थ्यांचे काहीही पडले नाही. आदिवासी विद्यार्थी अनेक दिवसांपासून वाढवलेल्या वयोमर्यादेविरोधात आंदोलन करत आहेत. वयोमर्यादेला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, ,सर्पदर्शाने मृत्यूमुखी पडलेल्या मुलींच्या कुटुंबीयांना सरकारने अजून एक कोटी जाहीर केलेले नाही, याकडे अमित ठाकरे यांनी लक्ष वेधले. पेपरफुटीबाबतही त्यांनी सरकारला सवाल विचारला. भविष्यात पेपरफुटी होऊ नये यावर सरकार कधी काम सुरू करणार? जेन झी हे खूप हुशार आहेत. त्यांना प्रश्न विचारायला दिले तर बाहेरचा दरवाजा दाखवतील. या सरकारने विकृत परिस्थिती आणून ठेवली आहे, असा आरोप अमित ठाकरे यांनी केला.
विद्यार्थ्यांनी बोलावे
आज मी जिथं जातो तिथे सेल्फी काढायला गर्दी होती. मला तुमच्या समस्या, अडचणी जाणून घ्यायच्या आहेत. मुली त्यांच्या अडचणी सांगत नाहीत. इकडे मी वॉशरूमला गेल्यावर खूप घाण दिसली. हे खूप गंभीर आहे. मला तरुणांना भेटायला आवडते, त्यांना भेटून मी भारावतो. मला त्यांच्याशी चर्चा करायला आवडते, असे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले.

