Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बाप्पाचे आवडते गुळाचे मोदक

बाप्पाचे आवडते गुळाचे मोदक

Prepare time: 15 minsCook: 30 minReady in: 45 mins
Ingredients

  • किसलेले ओले खोबरे - 2 वाट्या
  • चिरलेला गूळ -1 वाटी
  • वेलची पूड - 1/2 चमचा
  • तूप - 1 चमचा
  • तांदळाचे पीठ- 1 कप
  • पाणी - 1 कप
  • मीठ- चिमूटभर

  • तूप किंवा तेल - आवश्यकतेनुसार

Directions
  1. एका कढईत तूप गरम करून किसलेले खोबरे हलके परतून घ्या.
  2. त्यात गूळ घालून मंद आचेवर चांगले ढवळा.
  3. गूळ विरघळून मिश्रण घट्ट होईपर्यंत परता.
  4. शेवटी वेलची पूड घालून सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
  5. एका भांड्यात पाणी उकळत ठेवा. त्यात थोडेसे तूप आणि मीठ टाका.
  6. उकळी आल्यावर गॅस बारीक करून तांदळाचे पीठ थोडे-थोडे करून पाण्यात मिसळा.
  7. झाकण ठेवून 2 मिनिटे वाफेवर शिजवून घ्या.
  8. पीठ कोमट झाल्यावर हाताला थोडे तेल किंवा तूप लावून मऊसर मळून घ्या.
  9. मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून वाटीच्या आकारात पातळ पारी लाटून घ्या.
  10. पारीच्या मध्यभागी तयार केलेले गूळ-खोबऱ्याचे सारण भरा.
  11. पारीच्या कडांना हलक्या हाताने प्लेट्स पाडून वरच्या बाजूला एकत्र करून मोदकाचा टोकदार आकार द्या. मोदकाच्या चाळणीला किंवा पात्राला थोडे तूप लावून मोदक त्यावर ठेवा.
  12. 10 ते 12 मिनिटे मंद आचेवर मोदक वाफेवर शिजवून घ्या. स्वादिष्ट गूळ-खोबऱ्याचे मोदक तयार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar