Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारत-चीन संघर्ष पुन्हा पेटला, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने

भारत-चीन संघर्ष पुन्हा पेटला, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशामधील लाइन ऑफ ॲक्चुअल कंट्रोलवर (LAC) भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये पुन्हा एकदा तणाव वाढल्याचे समोर आले आहे. इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीसचे महासंचालक शत्रुजित कपूर यांनी या तणावाची पुष्टी केली आहे.

गेल्या काही दिवसांत सीमेवरील अनेक ठिकाणी दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये थेट आमनेसामने येण्याच्या घटना घडल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावर, माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनीदेखील मोठे विधान केले आहे.

ITBP चे महासंचालक शत्रुजीत सिंह कपूर यांनी अरुणाचल प्रदेशमधील सीमावर्ती भागातील सद्यस्थितीबद्दल मोठा खुलासा केला. "अरुणाचल प्रदेशमधील विविध भागांमध्ये भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले आहेत. आमच्या नुकत्याच स्थापन झालेल्या शौर्य कमांडोंनी अशा प्रसंगांमध्ये अत्यंत प्रशंसनीय भूमिका बजावली आहे. ITBP ची मूळ संकल्पना एक माउंटेन गुरिल्ला फोर्स म्हणून करण्यात आली होती. 2004 मध्ये आम्हाला चीनसोबतच्या सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली. आम्हाला आमच्या मूळ उद्दिष्टापासून दूर जाण्याची गरज नाही. लष्करापेक्षा वेगळे, आम्ही उच्च पर्वतीय प्रदेशात लढण्यासाठी विशेष प्रशिक्षित दल तयार करत आहोत. लवकरच आमच्याकडे शौर्य कमांडोची पूर्ण बटालियन असणार आहे. उच्च पर्वतीय प्रदेशात तैनात राहणे हीच आमची खरी ताकद आहे." राजस्थानमधील अलवर येथील 'सेंट्रल ट्रेनिंग कॉलेजमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान कपूर त्यांनी याबाबत माहिती दिली. "या चकमकीदरम्यान फोर्सच्या शौर्य कमांडो टीमने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली. अलीकडेच अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली, जिथे आमची सैन्याशी झकमक झाली असून ती अद्यापही सुरू आहे. तिथे आमच्या शौर्य कमांडो टीमने जबरदस्त कामगिरी केली आहे," असे आयटीबीपी प्रमुखांनी स्पष्ट केले.

निवृत्त माजी लष्करप्रमुख लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनीदेखील याबाबत मोठे विधान केले. "भारताच्या पश्चिम आणि उत्तरेकडील शेजारी देशांचे आव्हान मोठे असले, तरी त्याचा अर्थ भारताने नेहमीच युद्ध किंवा संघर्षाच्या छायेत राहावे असा होत नाही. वाद आणि मतभेद संवादाच्या माध्यमातून सोडवण्यालाच भारताचे पहिले प्राधान्य असायला हवे," असे ते यावेळी म्हणाले. " भारत आणि चीनमधील सीमा अद्याप पूर्णपणे निश्चित झालेली नाही. आंतरराष्ट्रीय सीमेप्रमाणे या सीमेला पूर्ण मान्यता मिळालेली नसल्यामुळेच मी 'बाउंड्री' या शब्दाचा वापर करत आहे. ज्या भागांत दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत, तिथे यापूर्वी चकमकी झाल्या आहेत आणि भविष्यातही तशी शक्यता नाकारता येत नाही. गलवान खोऱ्यातील हिंसक चकमक हीदेखील अशीच एक घटना होती." असेही ते यावेळी म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar