Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बीसीसीआयची आज बैठक; रोहित शर्माच्या भविष्याबाबत होणार निर्णय?

बीसीसीआयची आज बैठक; रोहित शर्माच्या भविष्याबाबत होणार निर्णय?

वी दिल्ली : बीसीसीआयची आज (3 सप्टेंबर) बैठक होणार असून, त्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या पराभवापासून ते मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या कार्यकाळापर्यंतच्या विविध बाबींवर यात निर्णय घेतले जाऊ शकतात.

विशेष म्हणजे आजच्या बैठकीत रोहित शर्माच्या भविष्याबाबतही चर्चा होण्याची अपेक्षा आहे. कारण गेल्या महिन्यात त्याच्या निवृत्तीच्या अफवांनी इंटरनेटवर मोठी खळबळ उडवून दिली होती.

'क्रिकबझ'च्या वृत्तानुसार, आजच्या बैठकीत रोहित शर्माच्या भविष्याबाबत चर्चा होऊ शकते. कारण लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर तो निवृत्ती घेईल, असे दावे केले जात होते. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, निवडकर्त्यांनी रोहितला स्पष्ट केले होते की, तो 2027 च्या विश्वचषकाच्या नियोजनाचा भाग नसेल. मात्र बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांच्या एका विधानानंतर परिस्थिती बदलली. देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले होते की, रोहित लॉर्ड्सवर निवृत्ती घेणार नाही. जोपर्यंत तो संघाच्या नियोजनाचा भाग असेल आणि तोपर्यंत खेळत राहील. मात्र देवजीत सैकिया यांचे हे विधान निवड समितीला फारसे रुचले नाही. कारण निवडकर्त्यांनी रोहितचा 2027 च्या विश्वचषकाच्या नियोजनात समावेश न करण्याचा निर्णय आधीच घेतला होता, असे समोर येत आहे.

रोहितच्या भविष्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत रोहितने अनुक्रमे 11 आणि 26 धावा केल्या होत्या. यानंतर रोहितच्या निवृत्तीबाबतच्या चर्चांना उधाण आले, मात्र त्यानंतर त्याने अंतिम एकदिवसीय सामन्यात शतक (138 धावा) झळकावत एक ऐतिहासिक खेळी केली. लॉर्ड्सवर एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. मात्र हे शतक झळकावूनही रोहित शर्मा पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात खेळणार की नाही, याबाबत अनिश्चितता कायम आहे. रोहित आता पुन्हा कधी मैदानात उतरेल? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. कारण बोर्डाच्या बैठकीत त्याच्या भविष्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar