Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चिकणघर गावठाणमधील रस्ते खड्डेमुक्त करा,केडीएमसी आयुक्तांना पत्र

चिकणघर गावठाणमधील रस्ते खड्डेमुक्त करा,केडीएमसी आयुक्तांना पत्र

ल्याण । कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. ६ चिकणघर गावठाण मधील म्हसोबा रिक्षा स्टँड ते नामदेव विहार - मनाली हाईटस् पर्यंतच्या बॉक्स नाल्यावरील रस्ता खड्डे मुक्त करणे तसेच चिकणघर गावठाण मधील म्हसोबा रिक्षा स्टँड ते नामदेव विहार पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असून याबाबत शिवसेना शाखा प्रमुख चेतन म्हामुणकर यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले आहे.

या रस्त्याच्या एका बाजुने मोठमोठे टॉवर उभे राहिले असुन काही ठिकाणी फुटपाथ बनले आहेत, परंतु रस्त्याच्या दुसऱ्या बाजुने गटार किंवा फुटपाथ नसल्याने पावससाचे पाणी जमा होऊन आहे.तसेच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरु असल्याने वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.या रस्त्याच्या पुढे गॅलेक्सी रेसिडेन्सी, मंगेशी ईलाईट, मंगेशी वर्ल्ड यांसारखे मोठे रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स असल्याने नागरी वस्ती झपाट्याने वाढली आहे. सर्व करदात्या नागरिकांना मुलभुत सोयी सुविधा देणे महापालिकेचे कर्तव्य असल्याने निवेदनात नमूद केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar