Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Chocolate banana bread : डबल चॉकलेट बनाना ब्रेड

Chocolate banana bread : डबल चॉकलेट बनाना ब्रेड

Prepare time: 15 Minutes Cook: 50 MinutesReady in: 65 Minutes
Ingredients

  • 3 पिकलेली केळी (मॅश केलेली)
  • ½ कप वितळलेले सॉल्टेड बटर (115 ग्रॅम)
  • ½ कप ब्राऊन शुगर (110 ग्रॅम)
  • ½ कप साखर (100 ग्रॅम)

  • 1 अंडे
  • ½ कप कोको पावडर (45 ग्रॅम)
  • 1 कप मैदा (120 ग्रॅम)
  • 1 टीस्पून बेकिंग सोडा (4.5 ग्रॅम)
  • चिमूटभर मीठ
  • ½ टीस्पून व्हॅनिला इसेन्स

Directions
  1. ओव्हन 350°F (175°C) वर प्रीहीट करून घ्या. लोफ टिन किंवा बेकिंग डिशला बटर लावून तयार ठेवा.
  2. एका मोठ्या भांड्यात पिकलेली केळी चांगली मॅश करून घ्या.
  3. त्यामध्ये वितळलेले बटर घालून व्यवस्थित मिसळा.
  4. ब्राऊन शुगर आणि साधी साखर घालून एकजीव होईपर्यंत फेटा.
  5. आता अंडे आणि व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा मिसळा.
  6. वेगळ्या भांड्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र चाळून घ्या.
  7. हे कोरडे मिश्रण ओल्या मिश्रणात थोडे-थोडे घालत हलक्या हाताने फोल्ड करा. जास्त फेटू नका.
  8. चॉकलेट चिप्स घालून हलक्या हाताने मिसळा.
  9. तयार मिश्रण बेकिंग टिनमध्ये ओता आणि वरून आणखी काही चॉकलेट चिप्स वरून टाका.
  10. प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 55 ते 65 मिनिटे बेक करा. मध्यभागी टूथपिक घातल्यावर ती जवळपास स्वच्छ बाहेर आली तर ब्रेड तयार आहे.
  11. बेक झाल्यानंतर 10-15 मिनिटे टिनमध्ये थंड होऊ द्या. त्यानंतर बाहेर काढून पूर्ण थंड झाल्यावर कापून सर्व्ह करा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar