Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
CJP च्या गाजलेल्या आंदोलनाची आता रुपेरी पडद्यावर एंट्री! 'The Accidental Cockroach Party' सिनेमाची घोषणा

CJP च्या गाजलेल्या आंदोलनाची आता रुपेरी पडद्यावर एंट्री! 'The Accidental Cockroach Party' सिनेमाची घोषणा

दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या आंदोलनाने देशभरात मोठी चर्चा रंगवली होती.

आता या आंदोलनावर आधारित 'The Accidental Cockroach Party' या नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, हा प्रोजेक्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. Film On CJP Protest at Jantar Mantar

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरचे गोविंद देव ब्रह्म यांनी या आंदोलनाशी संबंधित विविध पैलूंचा अभ्यास करून पटकथेवर काम सुरू केले आहे. या चित्रपटातून आंदोलनाचा प्रवास, त्यामागील नियोजन, पडद्यामागील घडामोडी आणि त्यावेळचे राजकीय वातावरण मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

आंदोलनापासून सिनेमापर्यंतचा प्रवास
NEET पेपरफुटीच्या आरोपांनंतर देशभरातील अनेक विद्यार्थी आणि तरुण दिल्लीतील जंतर-मंतर येथे एकत्र आले होते. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने शिक्षणव्यवस्था आणि राजकारण या दोन्ही स्तरांवर मोठी चर्चा निर्माण केली. या घडामोडींवर आधारित कथानक तयार करण्यात येत असून, आंदोलनाशी संबंधित अनेक पडद्यामागील पैलू या चित्रपटातून दाखवले जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

20 कोटींपेक्षा अधिक बजेट
हा चित्रपट केवळ डॉक्युमेंटरी स्वरूपाचा नसून, मोठ्या प्रमाणावर तयार होणारा फीचर फिल्म प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, या चित्रपटाचे बजेट 20 कोटी रुपयांहून अधिक असणार आहे. पटकथा अंतिम टप्प्यात असून, शूटिंगसाठी विविध लोकेशन्सची पाहणी सुरू आहे.

अभिजीत दिपकेंची भूमिका कोण साकारणार?
चित्रपटाच्या घोषणेनंतर सर्वाधिक चर्चा होत आहे ती कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भूमिका कोण साकारणार याची. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी बॉलिवूडमधील काही प्रमुख कलाकारांच्या नावांची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

२०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता
चित्रपटासाठी कलाकार, दिग्दर्शक आणि सह-निर्मात्यांची निवड अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व प्रक्रिया नियोजनानुसार पूर्ण झाल्यास 'The Accidental Cockroach Party' हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar