Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Crispy Bun Dosa: बन डोसा

Crispy Bun Dosa: बन डोसा

Prepare time: 10 MinutesCook: 15 MinutesReady in: 25 Minutes
Ingredients

  • रवा - १ कप
  • दही - ½ कप
  • पोहे - ½ कप
  • हिरवी मिरची - २
  • आलं - १ छोटा तुकडा
  • बेकिंग सोडा - ½ टीस्पून
  • पाणी - आवश्यकतेनुसार

  • तेल - डोसे भाजण्यासाठी
  • मीठ - चवीनुसार

Directions
  1. सर्वप्रथम पोहे एका मोठ्या वाटीत घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  2. मिक्सरच्या भांड्यात रवा, भिजवलेले पोहे, दही, चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घालून घट्टसर आणि गुळगुळीत मिश्रण वाटून घ्या.
  3. तयार मिश्रण एका भांड्यात काढा. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि किसलेले आलं घालून व्यवस्थित मिक्स करा.
  4. तुम्हाला आवडत असल्यास या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर किंवा इतर भाज्याही घालू शकता.
  5. आता मिश्रणात आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून डोशाच्या पिठापेक्षा थोडे घट्टसर पीठ तयार करा.
  6. सगळ्यात शेवटी बेकिंग सोडा आणि अर्धा ग्लास पाणी घालून मिश्रण हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करा.
  7. फोडणीची छोटी वाटी किंवा जाडसर कढई मंद आचेवर गरम करून त्यात थोडे तेल सोडा.
  8. कढई गरम झाल्यावर त्यात एक ते दीड डाव तयार पीठ घाला. पीठ चमच्याने जास्त पसरवू नका; बन डोसा थोडा जाडसरच ठेवा.
  9. झाकण ठेवून मंद आचेवर डोसा शिजू द्या. खालची बाजू सोनेरी आणि कुरकुरीत झाली की डोसा सावधपणे उलटा.
  10. दुसरी बाजूही छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  11. तयार बन डोसा तव्यावरून काढून गरमागरम सर्व्ह करा.
  12. हा कुरकुरीत बन डोसा नारळाची चटणी, सांबार किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar