Prepare time: 15 MinutesCook: 15 MinutesReady in: 30 Minutes
Ingredients
- मोठ्या, कमी तिखट हिरव्या मिरच्या - १० ते १५
- बेसन - १ कप
- तांदळाचे पीठ - २ टेबलस्पून
- ओवा - ½ टीस्पून
- लाल तिखट - १ टीस्पून
- हिंग - १ चिमूट
- मीठ - चवीनुसार
- तेल - तळण्यासाठी
- चाट मसाला - १ टीस्पून
Directions
- मोठ्या हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करा. प्रत्येक मिरचीला मधोमध उभी चीर द्या. कमी तिखट हवे असल्यास आतील बिया काढून टाका.
- एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, ओवा, लाल तिखट, हिंग आणि मीठ एकत्र करा. त्यात थोडे-थोडे पाणी घालून मध्यम पातळसर बॅटर तयार करा.
- कढईत तेल गरम करा. मिरच्या बॅटरमध्ये हलक्या हाताने बुडवून गरम तेलात सोडा. त्या पूर्ण कुरकुरीत न तळता हलक्या सोनेरी होईपर्यंत तळा आणि बाहेर काढा.
- अर्धवट तळलेल्या मिरच्यांचे २-३ तुकडे करा. हे तुकडे पुन्हा कडकडीत गरम तेलात सोडा आणि गोल्डन ब्राऊन व एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळा.
- तयार भजी एका बाऊलमध्ये काढा. त्यावर चाट मसाला आणि थोडे लाल तिखट भुरभुरवा. हलक्या हाताने टॉस करून गरमागरम चहासोबत सर्व्ह करा.

