Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमित शहा-अजित डोवाल यांचा धुंरधर आणि चाणक्य उल्लेख

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमित शहा-अजित डोवाल यांचा धुंरधर आणि चाणक्य उल्लेख

पुणे : केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी सारसबाग येथील स्मारकाला भेट देऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

त्यानंतर अमित शहा यांनी लोकमान्य टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान केला. दरम्यान, या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा आणि अजित डोवाल यांचा धुरंधर व चाणक्य असा उल्लेख केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा राष्ट्रीय सुरक्षेला ज्यांनी एक नवीन दिशा दिली आणि आपले संपूर्ण जीवन हे राष्ट्राकरिता समर्पित ठेवत आजही राष्ट्रीय सुरक्षेसाठी जे कार्य करत आहेत, अशा अजित डोवाल यांना मिळाला असल्यामुळे, याचा मला मनापासून आनंद आहे. तसेच विशेष आनंद हा आहे की, एका धुरंधराला पुरस्कार देण्याकरता दुसरे धुरंधर या ठिकाणी आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना चाणक्य म्हणून ओळखले जाते, त्यांना पुरस्कार देण्याकरता राजकीय क्षेत्रातले चाणक्य आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे हा दुग्धशर्करा योग आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा आणि अजित डोवाल यांचे कौतुक केले.

अजित डोवाल यांचे कौतुक करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली अजित डोवाल यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार केले. त्यानंतर अजित डोवाल यांनी देशाची सुरक्षा प्रणाली पूर्णपणे बदलण्याचे काम केले. अजित डोवाल यांनी राष्ट्रीय सुरक्षेची रणनीती, कूटनीती तयार केली. त्यामुळे आता भारत हा मार खाणारा देश राहिलेला नाही, तर मोदींच्या नेतृत्वाखाली घरात घुसून मारणारा देश झाला आहे. हा महत्त्वपूर्ण फरक भारताच्या संपूर्ण सामरिक शक्तीमध्ये आणि भारताच्या सामरिक नीतीमध्ये आणण्यामध्ये अजित डोवाल यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचे एक अतिशय महत्त्वाचे वाक्य आहे, 'There is no silver medal in national security. If you win, you make history. If you lose, you become history.' अशा पद्धतीने अतिशय परखडपणे आपले मत मांडणारे अजित डोवाल आहेत. त्यांनी वेळोवेळी आपला जीव धोक्यात घालून या देशासाठी कार्य केले आहे. त्यामुळे आज खरोखर त्यांच्यासारख्या व्यक्तीला, ज्यांनी कधीही पदक आणि पुरस्काराचा विचार केला नाही, अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळत आहे, ही आपल्या सगळ्यांकरिता आनंदाची गोष्ट आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अजित डोवाल यांचे कौतुक केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar