नितेश तिवारी दिगदर्शित रामायण, या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यातील दमदार स्टार कास्ट बघून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र यातील लारा दत्ता, साई पल्लवी आणि रकुल प्रीतचे पेहराव बघून प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
सोशल मीडियावर यावरून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.
4000 कोटींमध्ये रामायणची निर्मिती झाली असून बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर यात रामाच्या भूमिकेत असून सीतेच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी, तर दाक्षिणात्य अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत आहे. कैकयीच्या भूमिकेत लारा दत्ता तर शूपर्णखेच्या भूमिकेत रकुल प्रीत दिसणार आहेत. मात्र ट्रेलर मध्ये लारा दत्ता, साई पल्लीव आणि रकुलचा यांचा मॉर्डन लूक आणि हेअरस्टाईल बघून एकता कपूरची सिरियल बघतोय असं वाटतंय अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
कैकयी झालेल्या लारा दत्ताने नेसलेली डिझायनर रॉ सिल्क साडी, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवीला बघितल्यावर सीतेचे केसे कुरळे नव्हतेच, आणि शूपर्णखा झालेल्या रकुलचे सलून लुक बघून हे सगळे त्रेता युगात होत का असा सवाल केलाय.

