Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिवाळी पाडव्यासाठी कपल लूकपासून पारंपरिक साडीपर्यंत खास फॅशन आयडिया

दिवाळी पाडव्यासाठी कपल लूकपासून पारंपरिक साडीपर्यंत खास फॅशन आयडिया

दिवाळी पाडवा म्हणजे पारंपरिक सौंदर्य, प्रेम आणि उत्साहाचा संगम. या खास दिवशी अनेकजण आवर्जून पारंपरिक कपडे परिधान करतात. पती-पत्नीने एकसारख्या रंगसंगतीतील कपडे निवडण्यापासून ते साडी, एथनिक सेट आणि इंडो-वेस्टर्न लूकपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

यंदाच्या दिवाळी पाडव्याला तुमचा लूक खास बनवण्यासाठी या फॅशन आयडिया नक्की ट्राय करा.

पारंपरिक नऊवारी साडी
पारंपरिक लूक करायचा असेल तर सिल्क साडी किंवा नऊवारी साडी हा उत्तम पर्याय आहे. पैठणी, कांजीवरम किंवा बनारसी सिल्क साडीला पारंपरिक दागिन्यांची जोड दिल्यास लूक अधिक खुलून दिसतो. नऊवारी साडीसोबत नथ, ठुशी आणि पारंपरिक बांगड्या घालून मराठमोळा लूक करता येईल.

एथनिक को-ऑर्ड सेट
साडीपेक्षा आरामदायी आणि मॉडर्न लूक पसंत करणाऱ्यांसाठी एथनिक को-ऑर्ड सेट चांगला पर्याय आहे. कुर्ती आणि पँट, शॉर्ट कुर्ती आणि पलाझो किंवा एम्ब्रॉयडरी असलेले को-ऑर्ड सेट दिवाळी पाडव्यासाठी स्टायलिश दिसतात.

इंडो-वेस्टर्न आणि मॉडर्न लूक
पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा संगम साधायचा असेल तर इंडो-वेस्टर्न आउटफिट्स ट्राय करा. धोती पँटसोबत एम्ब्रॉयडरी टॉप, साडी गाऊन, जॅकेट स्टाइल कुर्ती किंवा केप असलेले आउटफिट्स दिवाळी पाडव्याला वेगळा लूक देतात. हा पर्याय खास फोटोशूट किंवा सणाच्या भेटीगाठींसाठीही आकर्षक ठरतो.

कपलसाठी खास मॅचिंग फॅशन
- पैठणी साडी आणि कुर्ता: पत्नीने पैठणी किंवा सिल्क साडी नेसावी आणि पतीने त्याच रंगाशी जुळणारा कुर्ता घालावा.
- लाल आणि सोनेरी रंगसंगती: पत्नीचा लाल किंवा मरून लेहेंगा आणि पतीचा सोनेरी किंवा मरून कुर्ता एकत्र छान दिसतो.
- पेस्टल कपल लूक: पत्नीने पेस्टल साडी किंवा अनारकली सूट आणि पतीने त्याच शेडचा कुर्ता किंवा नेहरू जॅकेट निवडावे.
- इंडो-वेस्टर्न कपल स्टाइल: पत्नीने साडी गाऊन किंवा एथनिक को-ऑर्ड सेट आणि पतीने मॉडर्न कुर्ता-पँट किंवा जॅकेट स्टाइल आउटफिट निवडावे.

ॲक्सेसरीजची जादू
आउटफिट कितीही सुंदर असला तरी योग्य ॲक्सेसरीजमुळे लूक अधिक खुलतो. पारंपरिक साडीसोबत नथ, ठुशी, चोकर, झुमके आणि बांगड्या वापरता येतील. मॉडर्न आउटफिट्ससोबत मिनिमल ज्वेलरी, स्टेटमेंट इअररिंग्स किंवा आकर्षक क्लच निवडता येईल. कपल लूकमध्ये दोघांनीही समान रंगाचे फुटवेअर किंवा एकसारख्या डिझाइनचा छोटा ॲक्सेसरी घटक निवडल्यास लूक आणखी खुलून येईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar