मैत्री हे आयुष्यातील सर्वात खास नात्यांपैकी एक मानले जाते. रक्ताचे नाते नसतानाही अनेक मित्र सुख-दुःखात कायम खंबीरपणे सोबत उभे राहतात. म्हणूनच दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या दिवशी अनेकजण मित्रांना शुभेच्छा देतात, भेटतात आणि छोटंसं पण मनापासून दिलेलं गिफ्ट देऊन मैत्री अधिक खास बनवतात.
महागडं गिफ्टच लक्षात राहतं असं नाही. योग्य विचार करून दिलेली छोटीशी भेटही आयुष्यभराची आठवण बनू शकते. जर तुमचं बजेट 1000 रुपयांच्या आत असेल, तर या हटके गिफ्ट आयडिया नक्की पाहा.
1.पर्सनलाइझ कॉफी मग
मित्रासोबतचा एखादा खास फोटो, एखादा मजेशीर डायलॉग किंवा मैत्रीची आठवण असलेला मेसेज प्रिंट केलेला मग हा नेहमीच आवडणारा पर्याय आहे. रोज वापरात येणारी ही भेट मित्राला तुमची आठवण करून देईल. याची अंदाजे किंमत: ₹250 ते ₹500 असते.
2. मिनी मेमोरी फ्रेम
एक सुंदर फोटो फ्रेममध्ये तुमचा आवडता फोटो किंवा छोटासा फोटो कोलाज तयार करून गिफ्ट करा. यासोबत एक छोटंसं हस्तलिखित पत्र ठेवल्यास भेट आणखी खास वाटेल याचा खर्च अंदाजे ₹300 ते ₹800 पर्यंत जातो.
3. इंडोअर प्लांट
जर तुमचा मित्र किंवा मैत्रीण निसर्गप्रेमी असेल, तर स्नेक प्लांट, झेड प्लांट, मनी प्लांट किंवा सक्युलंटसारखा इंडोअर प्लांट उत्तम पर्याय ठरू शकतो. ही भेट मैत्रीसोबतच सकारात्मकतेचं प्रतीकही ठरते. हे प्लांट अंदाजे ₹300 ते ₹700 रुपयांपर्यंत येतात.
4. सेंटेड कँडल सेट
सुगंधी मेणबत्त्यांचा छोटा गिफ्ट सेट हल्ली खूप ट्रेंडमध्ये आहे. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी आणि रिलॅक्स होण्यासाठी हा एक सुंदर आणि बजेट-फ्रेंडली पर्याय आहे. याची अंदाजे किंमत: ₹300 ते ₹600 असते
5. मिनी गिफ्ट हॅम्पर
स्वतः छोटंसं गिफ्ट हॅम्पर तयार करणं हा सर्वात वैयक्तिक आणि आकर्षक पर्याय ठरू शकतो.
मैत्रिणीसाठी:
हेअर स्क्रंचि
हेअर बो
हेअर क्लिप
लीप ग्लॉस
मिनी परफ्यूम
चॉकोलेट
स्मॉल ग्रीटिंग कार्ड
मित्रासाठी:
वॉलेट कार्ड
किचेन
मिनी परफ्यूम
कॉफी सॅचेट
चॉकोलेट
पर्सनलाइझ नोट

