Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Friendship Special Movies: मैत्रीचा खरा अर्थ समजून सांगणारे सुपरहिट चित्रपट

Friendship Special Movies: मैत्रीचा खरा अर्थ समजून सांगणारे सुपरहिट चित्रपट

सणं-रुसणं, संकटात पाठीशी उभं राहणं आणि कोणतीही अट न ठेवता आयुष्यभर जपणं, हाच खरा मैत्रीचा अर्थ असतो. बॉलिवूडपासून ते मराठी चित्रपटसृष्टीपर्यंत अशा अनेक कथा आहेत, ज्यांनी मैत्रीची नवी व्याख्या रचली, मैत्रीचा हा अर्थ दाखवला आहे.

आजच्या फ्रेंडशिप डे निमित्त मैत्रीचा खरा अर्थ सांगणाऱ्या सदाबहार आणि सुपरहिट चित्रपटांवर एक नजर टाकूया,

बनवाबनवी - 1988 मध्ये आलेला हा चित्रपट आजही पाहायला कंटाळा येत नाही. यातही मैत्रीचा अनोखा बंध दिसतो.

धडाकेबाज - 1990 मध्ये आलेल्या या चित्रपटामध्ये हास्य, विनोदासोबत मैत्री अनुभवता येतो.

बिनधास्त - चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट दोन मैत्रिणींमधील घट्ट नाते आणि स्त्री-मैत्रीचे भावविश्व दाखवतो.

क्षणभर विश्रांती - चार मित्र सुट्ट्यांसाठी बाहेर जातात आणि तेथे चार मुलींच्या प्रेमात पडतात. या चित्रपटात प्रेमासोबत मैत्रीचे अनेक पदर उघडतात.

दुनियादारी - 2013 मध्ये आलेला हा चित्रपट कॉलेजच्या काळातील आणि खऱ्याखुऱ्या यारी-दोस्तीची परिभाषा सांगणारा एक मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे.

पछाडलेला - आपला मित्र कितीही संकटात असला तरी त्याला सर्वातोपरी मदत करत मैत्रीसाठी काहीपण करण्याची जिद्द या चित्रपटातून पाहायला मिळते.

फ्रेंड्स - मैत्री कशी असावी हे दाखवणारा चित्रपट म्हणजे मैत्री. हा चित्रपट पाहताना तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले क्षण नक्कीच आठवतील.

क्लासमेट्स - कॉलेजच्या दिवसांमधील मैत्री, कट्टा आणि त्यासोबत गुंफलेले रहस्य सांगणारा हा एक तरुणाईचा आवडता चित्रपट आहे. आज तुम्ही हा चित्रपट मित्रांसोबत नक्कीच पाहू शकता.

ये रे ये रे पैसा - मित्रांच्या ग्रुपमधील धमाल आणि आर्थिक अडचणींवर मात करतानाची गमतीशीर कथा या चित्रपटात पाहायला मिळते.

वजनदार - हा चित्रपट दोन मैत्रीणींच्या आयुष्यावर आणि त्यांच्या वजनाच्या समस्येवर आधारीत आहे. यात मैत्री आणि स्त्री सशक्तीकरणासारखे विषय हाताळले आहेत.

शोले - ये दोस्ती हम नहीं छोडेंगे या गाण्यामुळे अजरामर झालेली जय आणि वीरूची ऐतिहासिक मैत्री या चित्रपटात दिसते.

थ्री इडियट्स - अभियांत्रिकीच्या शिक्षणादरम्यान तीन मित्रांची घट्ट मैत्री आणि संकटात एकमेकांची साथ देण्याची सुंदर गोष्ट यात दाखवली आहे.

दिल चाहता है - तीन मित्रांच्या वेगवेगळ्या विचारांचा प्रवास आणि त्यांची कायम टिकणारी घट्ट मैत्री या चित्रपटात पाहायला मिळते.

जिंदगी ना मिलेगी दोबारा - स्पेनमधील सहलीच्या निमित्ताने स्वतःला शोधणारे आणि मैत्री घट्ट करणारे तीन मित्र.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar