गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने श्रीगणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी मुंबईसह अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली. मात्र त्यांनतरही अनेकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी नेले. पाऊस कोसळत असताना अनेकांनी "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया"चा जयघोष करत गणपती बाप्पाला छत्रीच्या साहाय्याने आपल्या घरी नेले. पावसात बाप्पाची मूर्ती भिजू नये म्हणून प्लॅस्टिक पिशवीचा आधार घेतला होता. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांनी स्वत:ची गाडी किंवा टॅक्सीकरून गणपती बाप्पाचे आगमन केले. छोट्या मुलांनी ढोल ताशा वाजवत आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन केले.