Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गतिमंद अल्पवयीन नातीवर आजोबांकडूनच अत्याचार, इंदापूरमधील संतापजनक घटना

गतिमंद अल्पवयीन नातीवर आजोबांकडूनच अत्याचार, इंदापूरमधील संतापजनक घटना

पुणे : इंदापूर तालुक्यातून आजोबा आणि नातीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातील भादलवाडी गावात एका गतिमंद अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत आजोबाने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून भिगवण पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. तर, पोलिसांचा या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजी दणाणे असून तो 67 वर्षांचा आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या आईचा चुलता असल्याने मुलीच्या नात्याने आजोबा लागतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला मुलगी अल्पवयीन आणि गतिमंद असल्याची पूर्ण कल्पना असतानाही त्याने घरात तिच्याकडून हात-पाय दाबून घेतले. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या शरीरावर नको त्या जागी स्पर्श करून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घडलेला प्रकार मुलीच्या आईच्या निदर्शनास आल्यानंतर तिने तातडीने भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पॉक्सोसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करत आरोपीला तत्काळ अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या आईचा चुलता असल्याने या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. नात्यांचा विश्वासघात करणाऱ्या या प्रकाराबाबत नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar