भावा-बहिणीचं नातं हे नेहमीचं खास असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या सिनेसृष्टीत अशा अनेक भाऊ-बहिणींच्या जोड्या आहेत ज्यांनी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. चला तर मग जाणून घेऊया बॉलीवूड इंडस्ट्रीतील अशाच काही जोड्या.
real life sister and brother in bollywood - Google Search
सैफ अली खान आणि सोहा अली खान हे दोघे पतौडी कुटुंबातील भाऊ बहिण आहेत, जे वेगवेगळ्या चित्रपटांतून आणि वेब सिरीजमधून काम करतात.सलमानला दोन बहिणी आहेत,अर्पिता आणि अलवीरा. यात सलमानचं अर्पितासोबतचं नातं खास आहे.प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा यांचा बॉलिवूडशी जरी संबंध नसला, तरी आपल्या बहिणीच्या कामात तिला मदत करत असतो.फरहान अख्तर आणि झोया अख्तर या दोघांनी दिग्दर्शन, लेखन आणि अभिनयात स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला आहे.कपूर घराण्याची लाडकी भावंडे रणबीरने अभिनयाने बॉलीवूड गाजवलं तर रिद्धिमाने ज्वेलरी डिझायनिंग क्षेत्रात आपलं मोठं नाव कमावलं आहे.बॉलिवूडमध्ये आणखी एक भावा बहिणीची जोडी आहे ती म्हणजे अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर.हुमा आणि साकिबच्या जोडीने दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे.भाऊ इब्राहमसोबत सारा अली खानचे घट्ट नाते आहे.टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ हे जॅकी श्रॉफची मुलं आहेत. टायगर आणि कृष्णा फिटनेस फ्रिक आहेत. ही दोघं बॉलिवूडची हॉट भावंड आहेत.एकता कपूर आणि तुषार कपूर यांच्यातील घट्ट नातं सोशल मीडियावर नेहमीच पाहायला मिळतं.
