Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ही सरकारची सर्वात मोठी चूक, ज्ञानेश कुमारांना संरक्षण देण्यावरून राहुल गांधींचे मोठे विधान

ही सरकारची सर्वात मोठी चूक, ज्ञानेश कुमारांना संरक्षण देण्यावरून राहुल गांधींचे मोठे विधान

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून देशात संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी राजीनामा द्यावा, या एका मागणीसाठी देशभरात आंदोलन सुरू आहेत.

एका बाजूला विरोधक तर दुसऱ्या बाजूला देशातील तरुणाई अशा सर्वांनी मिळून सरकारला घेरत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशातच आता लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या संरक्षणावरून मोठे विधान केले आहे. आम्हाला वाटते की सरकारने ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावे. ते जेवढे प्रोटेक्ट करतील तेवढे आम्ही त्यांच्या कंट्रोलरकडे जाऊ, असे राहुल गांधीनी म्हटले आहे.

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची आज सोमवारी (12 ऑक्टोबर) दिल्लीत पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी थेट मोदी सरकारला आव्हान दिले आहे. तर, यापुढे ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनाची रणनिती कशी असणार याबाबतची सुद्धा त्यांनी माहिती दिली. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हटले की, आम्ही आंदोलन करत आहोत. सरकारने रस्त्यारस्त्यावर हजारो पोलीस तैनात केले आहेत. दिल्लीला एखाद्या किल्ल्यासारखे स्वरुप आले आहे. असे करून सरकार मोठी चूक करत आहे. आम्हाला हेच हवे आहे. मोदी आणि त्यांचे लोक ज्ञानेश कुमार यांना अभय देत आहेत. आम्ही राजीनामा मागत आहोत, तरी ते राजीनामा घेत नाहीत. त्यांना अभय देत आहेत. आम्हाला तेच हवे आहे, असे राहुल गांधींकडून ठामपणे सांगण्यात आले आहे.

तसेच, ज्ञानेश कुमार आणि व्होट चोरीवरून गेल्या चार पाच दिवसापासून दिल्लीत लोकांचे आंदोलन सुरू आहे. देशाची राजधानी दिल्ली तुरुंगासारखी का बनली आहे? ट्रेन, बसेस रोखण्यात येत आहेत. दिल्लीचा किल्ला बनवला आहे. सर्वत्र 20 ते 30 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आम्हाला वाटते की 20 ते 30 हजार पोलीस रस्त्यावर यावेत. कारण हे करून हे सरकार मोठी चूक करत आहे. आम्हाला देशाला दाखवायचे आहे की सरकार आणि नरेंद्र मोदी हे ज्ञानेश कुमार यांना अभय देत आहेत. आम्ही राजीनामा मागत आहेत, पण आम्हाला वाटते की ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावे. ते जेवढे प्रोटेक्ट करतील तेवढे आम्ही त्यांच्या कंट्रोलरकडे जाऊ, असे राहुल गांधी म्हणाले.

तर, आम्हाला सगळीकडून माहिती मिळत आहे. ज्ञानेश कुमार यांची काय हालत आहे हे आम्हाला माहीत आहे. तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही. घाबरू नका. आम्ही तुम्हाला सोडणार नाही. लाखो लोक रस्त्यावर आहेत. तुमच्या स्वभावाबाबत ते विचारत आहेत. तुमच्यासमोरही काही लोक आहेत. त्यांना हटवण्यासाठी आम्हाला तुम्हाला हटवायचं आहे. त्यामुळेच आमचं आंदोलन सुरू आहे. परंतु, या आंदोलनामुळे आता पोलीसही डिस्टर्ब होऊ लागल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. कारण, आम्हाला तरुणांना का मारायला सांगत आहात? असा सवाल पोलीस करत असल्याची माहिती राहुल गांधींनी पत्रकार परिषदेतून दिली. संघाच्या लोकांना मुक्त फिरवण्यास मुभा देण्यास सांगितले जात आहे. पोलीस, सीआरपीएफ, आयटीबीटीत हा सवाल केला जात आहे. भाजपचे गुंड महिलांना मारत आहेत. तरुणांना मारा, पॅलेट गन चालवा म्हणून सांगत आहेत. दुसरीकडे संघाचे तरुण आणि गुन्हेगारांना सोडा आणि या लोकांच्या माध्यमातून तरुणांना मारहाण करा, असे पोलिसांना सांगितलं जात आहे. यामुळे आम्हाला फायदा होत आहे. मी तुम्हाला आनंदाने सांगतो, 50 टक्के पोलीसवाले सांगत आहेत, तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे. तुम्ही करत राहा, असे ते म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar