Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांना अखेरचा निरोप, अंत्यसंस्काराशी संबंधित विधी 6 दिवस चालणार

इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांना अखेरचा निरोप, अंत्यसंस्काराशी संबंधित विधी 6 दिवस चालणार

नवी दिल्ली : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अधिकृत अंत्यसंस्काराला आजपासून (4 जुलै) सुरुवात झाली आहे. खामेनी यांच्या अंत्यसंस्काराचे विधी 9 जुलैपर्यंत चालणार आहे.

त्यामुळे खामेनी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत. ज्यात भारताचे प्रतिनिधित्व बिहारचे राज्यपाल, लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा देखील उपस्थित आहेत. दरम्यान, खामेनेई यांच्यावर अंत्यसंस्कार कसे पार पडतील, यावर आपण एक नजर टाकूया.

अंत्यसंस्काराची प्रक्रिया 'गुस्ल'ने (मृत व्यक्तीचे धार्मिक शुद्धीकरण) सुरू झाली आहे. शिया इस्लामिक परंपरेनुसार, मृतदेह तीन टप्प्यांत धुतला जातो. पहिल्या टप्प्यात कमळ किंवा बोराची पाने (जुजुबची पाने) मिसळलेले पाणी वापरले जाते. त्यानंतर कापूर मिसळलेले पाणी आणि शेवटी शुद्ध, स्वच्छ पाणी वापरले जाते.

पांढऱ्या कपड्यात मृतदेह गुंडाळणे

धार्मिक विधीनुसार स्नान घातल्यानंतर मृतदेह एका साध्या पांढऱ्या सुती कापडात गुंडाळला जाईल, ज्याला 'कफन' (मृतदेह झाकण्याचे वस्त्र) म्हणतात. शिया परंपरेत कफनमध्ये साधारणपणे कापडाचे तीन स्वतंत्र तुकडे असतात. यामध्ये 'लुत्का' (शरीराचा खालचा भाग झाकणारे वस्त्र), त्यानंतर 'कमीझ' (शर्ट) आणि 'इझार' (डोक्यापासून पायापर्यंत शरीर झाकणारी मोठी चादर) यांचा समावेश असतो. या प्रक्रियेदरम्यान, शरीराच्या त्या सात भागांवर कापूर लावला जातो जे इस्लामिक नमाजमधील 'सजदा' (साष्टांग प्रणाम) करताना जमिनीला स्पर्श करतात.

सार्वजनिक निरोप आणि अंत्ययात्रा

कफन गुंडाळण्याच्या विधीनंतर, मृतदेह सार्वजनिक दर्शनासाठी आणि अंत्ययात्रेसाठी बाहेर आणला जाईल. त्यानंतर, 'नमाज-ए-जनाझा' नावाची विशिष्ट अंत्यसंस्काराची प्रार्थना करण्यात येईल. सामान्य इस्लामिक प्रार्थनेशिवाय या विधीमध्ये वाकून नमस्कार, किंवा साष्टांग प्रणाम (सजदा) करणे यांचा समावेश नसतो.

दफनविधी

अंत्यसंस्काराची प्रार्थना झाल्यानंतर मृतदेह दफन केला जाईल. महत्त्वाचे म्हणजे कबर अशा प्रकारे तयार केली जाते की, मृत व्यक्तीचा चेहरा मक्केच्या दिशेने असेल. मृतदेह कबरीत ठेवल्यानंतर कफनच्या गाठी सोडल्या जातात आणि मृतदेहाचा चेहरा जमिनीच्या दिशेने, परंतु मक्केच्या दिशेकडे वळवून ठेवला जातो. कबर पूर्णपणे बंद करण्यापूर्वी, शिया धर्मगुरू 'तल्कीन'चे पठण करतात. हे एक पारंपरिक पठण आहे, ज्याद्वारे मृत व्यक्तीला श्रद्धेची तत्त्वे आणि शिया इमामांची नावे यांची आठवण करून दिली जाते. त्यानंतर, लाकडी फळ्या किंवा दगडांचा वापर करून कबर झाकली जाते आणि ती मातीने भरली जाते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar