Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
झणझणीत मालवणी कोळंबी रस्सा, वाचा सोपी अन् झटपट रेसिपी

झणझणीत मालवणी कोळंबी रस्सा, वाचा सोपी अन् झटपट रेसिपी

Prepare time: 20 minsCook: 20 minsReady in: 40 min
Ingredients

  • कोळंबी - 250 ग्रॅम
  • ओले खोबरे - 1 कप
  • कांदा - 2 (एक बारीक चिरलेला, एक वाटनासाठी)
  • आले-लसूण पेस्ट - 1 मोठा चमचा
  • टोमॅटो - 1
  • मालवणी मसाला - 2 ते 3 चमचे

  • हळद - 1/2 चमचा
  • कोकम - आंबटपणासाठी
  • तेल - 2 ते 3 मोठे चमचे
  • मीठ - चवीनुसार
  • पाणी - आवश्यकतेनुसार

Directions
  1. स्वच्छ केलेल्या कोळंबीला थोडे मीठ आणि हळद लावून 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवा.
  2. एका पॅनमध्ये थोडे तेल टाकून किसलेले खोबरे आणि कांद्याचे तुकडे हलके खमंग परतून घ्या.
  3. हे परतलेले खोबरे, कांदा, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून एकदम बारीक करून घ्या.
  4. एका कढईत तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परता.
  5. नंतर त्यात आले-लसूण पेस्ट आणि चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो पूर्णपणे शिजेपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
  6. त्यात मालवणी मसाला आणि हळद घालून चांगले मिक्स करा.
  7. आता त्यात मॅरीनेट केलेली कोळंबी घाला आणि मसाल्यासोबत 2 मिनिटे परतून घ्या.
  8. तयार केलेले खोबऱ्याचे वाटण कढईत टाका आणि आवश्यकतेनुसार पाणी मिसळून ग्रेव्हीची पातळ वा घट्ट कन्सिस्टन्सी सेट करा.
  9. आंबटपणासाठी त्यात कोकम घाला.
  10. चवीनुसार मीठ टाका आणि मध्यम आचेवर करीला 5 ते 7 मिनिटे चांगली उकळी येऊ द्या, जेणेकरून कोळंबी व्यवस्थित शिजेल.
  11. गॅस बंद करा आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा.
  12. गरम भात किंवा भाकरीसोबत ही चवदार प्रॉन्स करी सर्व्ह करा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar