Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जुही चावलाचं फिटनेस सिक्रेट, या गोष्टींमुळे वयाच्या 58 व्या वर्षीही दिसते विशीतली

जुही चावलाचं फिटनेस सिक्रेट, या गोष्टींमुळे वयाच्या 58 व्या वर्षीही दिसते विशीतली

याच्या 58 व्या वर्षीही बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला अत्यंत फिट आणि सुंदर दिसते. आजही तिचे चाहते लाखोंमध्ये आहेत. तिच्या चाहत्यांना जुहीचं सौंदर्य आणि फिटनेसविषयी कायमचं आश्चर्य वाटतं, कारण वयाच्या 58 व्या वर्षीही ती विशीतली वाटते.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिच्या या एव्हरग्रीन लूकचं सिक्रेट कोणतेही महागडे उपचार नसून तीचं एक सिक्रेट आहे.

जुही वयाच्या 58 व्या वर्षीही इतकी फिट राहण्यासाठी योग करते. ती जवळपास दोन दशकांपासून योगाचा सराव करते. नुकताच झालेल्या योग दिनानिमित्त तिने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली. तिने या व्हिडिओमध्ये दोन दशकांपासून योग करत आहे आणि तिला त्याचा कसा फायदा झाला हे सांगितलं. याशिवायही काही गोष्टी ती नित्यनियमाने फॉलो करते यावर एक नजर टाकूया.

चाळिशीतही चेहरा दिसेल विशीतला, फॉलो करा या मॅजिक टिप्स

जुही चावला फिट राहण्यासाठी काय करते?

  • जुही सकाळची निरोगी पद्धतीने सुरुवात करते. ती सकाळी लवकर उठते, सूर्योदयाचा अनुभव घेते, ताज्या हवेत श्वास घेते.
  • जुही सकाळी सर्वात आधी 3 ते 4 ग्लास पाणी पिते. ती म्हणते की ती वयाच्या 15 व्या वर्षापासून ही सवय नित्यनियमाने फॉलो करत आहे.
  • फिट राहण्यासाठी ती काही फळे खाते, विशेषतः पपई. पपईचं सेवन केल्यानंतर कोवळ्या उन्हामध्ये स्ट्रेचिंग, योगा आणि ब्रीदिंग एक्सरसाईज करते.
  • मसालेदार जेवण करणे जुहीला आवडत नाही. ती उकडलेले भाज्याचं खाणं पसंत करते.
  • आहारात दही न चुकता खाते यासह पांढऱ्या तांदळाचा भात खाणं टाळते.
  • जुही तिचा सकाळचा व्यायाम पूर्ण होईपर्यंत इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देण्याचा प्रयत्न करते. तिच्या मते, सकाळची वेळ शांतता आणि सकारात्मक विचारांसाठी असते. जेव्हा मन शांत असते तेव्हा दिवसभर एकाग्रता आणि ऊर्जा टिकून राहते.

हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar