Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
काम करताना योग्य पोश्चर कसे ठेवावे?

काम करताना योग्य पोश्चर कसे ठेवावे?

कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपसमोर तासनतास एकाच जागी बसून काम केल्यामुळे मान, पाठ आणि खांदे दुखण्याची समस्या जाणवणे सामान्य झालं आहे. पण या त्रासाचे मुख्य कारण तुमची चुकीची बसण्याची पद्धत असू शकते.

काम करताना योग्य पोश्चर ठेवल्यास शरीराचा ताण कमी होतो आणि गंभीर आजार टाळता येतात. चुकीच्या पोश्चरमध्ये बसल्याने उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी ऑफिसमधील डेस्क एर्गोनॉमिक्सकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एर्गोनॉमिक्स म्हणजे शरीराच्या नैसर्गिक गरजेनुसार कामाची जागा आणि खुर्चीची रचना सेट करणे. posture tips while working

एर्गोनॉमिक्स टिप्स

खुर्ची आणि बसण्याची पद्धत - खुर्चीची उंची अशी ठेवा जेणेकरून तुमचे पाय जमिनीवर सपाट टेकतील. पाठीच्या खालच्या भागाला योग्य आधार मिळण्यासाठी सपोर्ट वापरा किंवा एर्गोनॉमिक खुर्ची निवडावी.

स्क्रीनची पातळी - कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपची स्क्रीन डोळ्यांच्या थेट रेषेत (Eye level) असावी. स्क्रीन खूप खाली किंवा वर असल्यास मानेवर नाहक ताण येतो.

कोपर आणि हातांची स्थिती - कीबोर्डवर टाइप करताना तुमचे हात आणि कोपर 90 अंशांच्या कोनात असावेत. मनगट सरळ ठेवून काम करा.

स्क्रीनपासून अंतर - मॉनिटर आणि तुमच्यात किमान एका हाताचे अंतर असणे आवश्यक आहे.

20-20-20 चा नियम - डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी 20 फूट अंतरावर असलेल्या वस्तूवर लक्ष केंद्रित करावे.

दर तासाला किमान 2 ते 3 मिनिटे ब्रेक घेऊन थोडे चालावे किंवा हलका स्ट्रेचिंग करावे. या बदलांमुळे तुम्ही आरोग्याची काळजी घेत तणावमुक्त काम करू शकता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar