Prepare time: 10 minCook: 20 minsReady in: 30 mins
Ingredients
- मेथीची जुडी - 1 मध्यम
- बेसन - 1 वाटी
- हिरव्या मिरच्या -5 ते 6
- कोथिंबीर - गार्निशींगसाठी
- धणे - 1 चमचा
- हळद - 1/2 चमचा
- मीठ - चवीनुसार
- तेल
Directions
- मेथी बारीक चिरून घ्यावी आणि धुवून चाळणीवर निथळत ठेवावी.
- मिरच्या बारीक कराव्यात.
- नंतर डाळीचे पीठ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कुटलेले धणे, हळद आणि चवीनुसार मीठ एकत्र करून घ्यावे.
- मळलेल्या पीठाचे लहान गोळे करावेत आणि नंतर किचिंत लांब आकार द्यावा.
- आता कुकरमध्ये चाळणीला तेलाचा हात लावावा आणि त्यावर गोळे वाफवून घ्यावेत.
- गार झाल्यावर कढईत तेलाची फोडणी देऊन त्यावर परतावेत.
- फोडणीसाठी तुम्ही कडीपत्त्याचा वापर करू शकता.

