- डॉ.महेश केळुसकर
माझ्या आयुष्यातली पयली कविता मी १९७८ साली भरलेल्या कोजागरी कविसंमेलनात वाचलंय. त्या कविसंमेलनाचे अध्यक्ष होते कविवर्य बाकीबाब बोरकर आणि माज्या त्या मालवणी कवितेचा नाव होता 'बाळगो नि मालग्या'.
ती मालवणी कविता वाचताना माजे पाय लटपटत होते, पण आबा बोरकरांनी माझ्या पाठीर हात ठेवन माका धीर दिलो. मी कविता वाचून व्हरांड्याचे पायरे खाली उतरत आसताना 'वन्स मोर वन्स मोर'चो गजर आयकलय, पण माका अनुभव नसल्यामुळे मी परत ऑडियन्समध्ये येऊन बसलय. ही 'झिनझिनाट'च्या खूप आदीची गजाल. ती पयली कोजागरी माज्या कायमची लक्षात र्हवली.
बरेच लोक कोजागरीक, कोजागिरी पौर्णिमा म्हणतत. गिरी म्हणजे पर्वत. तेचो आणि कोजागरीचो काय्येक संबंद नाय. तर सांगूची गजाल म्हंजे आज कोजागरी पौर्णिमेक लक्ष्मी देवी भूतलावर अवतरतली आनि इच्यारतली-को जागर्ति? कोण कोण जागे आसत ? जे लोक आरोग्य, स्वच्छता आनि भक्तीभावात रमलेले आसतले त्येंच्यावर लक्ष्मीची कृपा होतली. कोजागरीच्या रात्री चंद्राच्या उजेडात आटवलेला मसाला दूध पिवन गाणीबिणी म्हणाची आसतत आनि मित्रमंडळी जमवन चांगले गजाली करूचे आसतत. पण काय काय लोक दूध पिवच्या ऐवजी कोजागरीच्या रात्री पण दुसराच काय काय पितत नी थयच्या थय गुटले होवन लकाटतत नी घोराक लागतत. कोजागरीच्या निमतान ह्या नमनाक घडाभर दूध मी वतलय ता इसरान जावा आनि फुडे काय आता सांगतय ता आयका मंडळी.
ही आठवण १९७६-७९ च्या दरम्यानची. सावंतवाडीत दक्षिण रत्नागिरी साहित्य संघातर्फे (आताचो सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संघ, सावंतवाडी) दरवर्षी कोजागरी कवी संमेलन भरायचा. जिल्ह्यातले सगळे जुने-नवे कवी आपापले कविता वाचायचे. त्येच्यात अर्दे मालवणी कविता आसायचे. डॉ.वसंत सावंत सर आणि तेंच्यावांगडा मी मालवण, देवगड, फोंडा, कणकवली, कुडाळ, माणगाव खय खय कविसंमेलना करीत फिरायचव. मराठी आणि मालवणी कविता वाचायचव. पण ह्या सगळ्यात सावंतवाडीचा कोजागरी कविसंमेलन खास आसायचा. संमेलन झाल्यारसुद्धा वर्षभर त्या संमेलनात कवींनी म्हटलेल्या कवितांची चर्चा चलायची.
माजे गुरु आणि दक्षिण रत्नागिरी साहित्य संघाचे संस्थापक वसंत सावंत म्हणजे मराठीतले मोठे कवी. मुंबय-पुण्यातच न्हय तर संपूर्ण महाराष्ट्रात त्येंच्या वळखीचे मोठमोठे नामवंत कवी होते आणि सावंत सरांच्या शब्दाखातर ते सावंतवाडीच्या ह्या न्हानशा कोजागरी कविसंमेलनासाठी एवढ्या लांब यायचे. अध्यक्ष म्हणून येणार्या अशा कवींका त्या काळात १०१ रुपये मानधन देवचा लागायचा. शिवाय तेंच्या ठिकाणासून वाडीपर्यंत येण्याजाण्याचो लक्झरीचो प्रवासखर्च. त्यावेळी कोकण रेल्वे नाय होती. त्यामुळा हे कवी लक्झरीन यायचे. दुसरा म्हंजे सावंतवाडीत एक-दोन लॉजा होती. पण ती अशा मोठ्या माणसांनी र्हवण्याच्या लायकीची नव्हती. त्याच्यामुळा वसंत सावंत सर आपल्या घराकडेच ह्या कवींची एका दिवसाची र्हवण्याची सोय करीत.
सावंतवाडीत मोती तलावाच्या काठावर आरपीडी हायस्कूल आसा. तर त्या हायस्कूलचे संचालक आणि सगळे शिक्षक आमच्या सावंत सरांचे चाहते. मी पण नववी ते अकरावीपर्यंत त्याच हायस्कूलला शिकलंय. तर त्या आरपीडीच्या व्हरांड्यात आमी खयच्यातरी वर्गातला याक टेबल आणून ठेवायचव आनि त्येच्यावर कोणाच्यातरी घरातसून आणलेली चादर टेबलक्लॉथ म्हणून घालायचव. टेबलावर एक थंड पाणयान भरलेलो तांबयो आणि तेच्यार पेलो ठेवायचव. टेबलाफुडे चार खुर्चे पत्र्याचे. एका खुर्चेर कविसंमेलनाचे अध्यक्ष. दुसर्या खुर्चेर सावंत सर. तिसर्येर आमच्या साहित्य संघाचे उपाध्यक्ष तुकाराम नाईक सर आणि चौथ्या खुर्चेर कार्याध्यक्ष प्रा. एच.व्ही. देशपांडे विराजमान व्हायचे. व्हरांड्यासमोर न्हानसा पटांगण होता. कविसंमेलनाच्या आदी आमी कार्यकर्ते ता पटांगण झाडून पुसून चकचकीत लख्ख करायचव. त्येच्यार ताडपत्री घालायचव. व्हरांड्याच्या एका खांबार एक लाऊड स्पीकर. तेका आमी पुण्याल म्हणायचव. त्येचा याक त्वांड तळ्याच्या एका दिशेक आणि दुसर्या लाऊड स्पीकरचा तळ्याच्या दुसर्या दिशेक. पटांगणातल्या ताडपत्रेर कविसंमेलन आयकाक इलेल्या रसिकांची गर्दी हाऊसफुल आसायची. शिवाय तळ्याच्या कठड्यावर खूप लोक कविसंमेलन आयकाक शेवटपर्यंत बसलेले आसायचे.
वावावा…काय दिवस होते ते !काय वातावरण होता!
कविसंमेलनाची सुरवात आ.द.राणे गुरुजींच्या गीतगायनान व्हायची आणि मग एका मागसून एक कवी आपापले कविता म्हणायचे. सूत्रसंचालन-बित्रसंचालन काय नव्हता. आमचे देशपांडे सर कवींची नावा एका मागसून एक वाचायचे आनि कवी आपली कविता म्हणान परत खाली जायचे. काय काय कवितांका 'वन्स मोर' पण मिळायचो. माझ्या आयुष्यातली पयली कविता मी १९७८ साली भरलेल्या कोजागरी कविसंमेलनात वाचलंय. त्या कविसंमेलनाचे अध्यक्ष होते कविवर्य बाकीबाब बोरकर आणि माज्या त्या मालवणी कवितेचा नाव होता 'बाळगो नि मालग्या'. ती मालवणी कविता वाचताना माजे पाय लटपटत होते. पण आबा बोरकरांनी माझ्या पाठीर हात ठेवन माका धीर दिलो. त्यावेळी माजा वय होता अवघ्या १९! मी कविता वाचून व्हरांड्याचे पायरे खाली उतरत आसताना 'वन्स मोर वन्स मोर'चो गजर आयकलंय पण माका अनुभव नसल्यामुळे मी परत ऑडियन्समध्ये येऊन बसलय. मग बाकीबाब माइकसमोर इले आणि माजा नाव घेवन परत माका बोलावल्यानी आणि परत एकदा मी 'बाळगो नि मालग्या' ही कविता वाचलंय. ही 'झिनझिनाट'च्या खूप आदीची गजाल. ती पयली कोजागरी माज्या कायमची लक्षात र्हवली.
फुडे मग मी मुंबईत १९९१ साली इल्यार माका आ.ना.पेडणेकर सर भेटले. तेनी मालवणी मुलुख आनि मालवणी लोकजीवन आपल्या कथा-कवितातसून आणलेला आसा. मग मच्छिंद्र कांबळी म्हणजे बाबूजी, ज्योतिर्भास्कर साळगावकर काका आणि सिंधुदुर्ग सांस्कृतिक केंद्रातर्फे परळच्या दामोदर थिएटरच्या परिसरात मालवणी स्नेहसंमेलना भराक सुरवात झाली नि दरवर्षी तेच्यात याक मालवणी कविसंमेलन भरवची जबाबदारी माज्यार टाकल्यानी. ही कविसंमेलना आयकाक हजारांची गर्दी आसायची. त्या काळात दादू परब, पंढरीनाथ राणे, डॉ. सतीश कानविंदे, रमेश आणावकर, स्वप्नगंधा कुलकर्णी, मंदाकिनी गोडसे, शरयू आसोलकर, अरविंद म्हापणकर, ना.शि.परब, शांताराम नांदगावकर, आ.ना. पेडणेकर, वसंत सावंत, मंगेश पाडगावकर ह्या सगळ्यांनी ११ नोव्हेंबर १९९४ रोजी झालेल्या कविसंमेलनात मालवणी कविता वाचल्याची नोंद माझ्याकडे आसा. रात्री खास ८-३० ते १२-३० पर्यंत झालेल्या या मालवणी कविसंमेलनाचा सूत्रसंचालन माका करूक मिळाला ह्या मी माजा भाग्य समाजतंय.
रोज नवे नवे मालवणी कवी उदयाक येतत ह्या बघून माका आनंद होता. मालवणी कवितेची ताकदच तशी मोठी आसा. तेराव्या शतकात होवन गेल्ल्या संत नामदेवांच्या एका अभंगात, पाव गा दातारा । तू नंदाचो झीलो । माका फडको दी । मी हिवान मेलो ॥ असो उल्लेख आसा -आसात खय?

