पावसाळा किती आल्हाददायक वाटत असला तरी या ऋतूत अनेक आजारांसोबत केसगळतीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. पावसाळ्यातील हवेतील आर्द्रता आणि दमटपणामुळे टाळूवर चिपचिपेपणा वाढतो, ज्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस दुप्पट वेगाने गळू लागतात.
अशा वेळी तुम्ही महागडे शॅम्पू किंवा केमिकल ट्रीटमेंट्स करण्याऐवजी स्वयंपाकघरातील घटकांपासून तयार केलेले हेअर मास्क नक्की ट्राय करू शकता.
मेथी दाणे आणि दही
मेथीमध्ये निकोटिनिक ॲसिड आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते, जे केस गळती रोखते आणि दही टाळूवरील संसर्ग कमी करते.
बनवण्याची पद्धत - 2 चमचे मेथी दाणे रात्री पाण्यात भिजत घाला. सकाळी ते वाटून त्याची पेस्ट बनवा आणि त्यात 3 चमचे ताजे दही मिक्स करा.
कसे वापराल?
हा मास्क केसांच्या मुळांशी मिनिटे लावा. 30 मिनिटांनंतर केस सौम्य शॅम्पूने धुवून टाका.
कांद्याचा रस आणि कोरफडीचा मास्क
कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते, जे नवीन केस येण्यास मदत करते आणि कोरफड केसांना मऊ बनवते.
बनवण्याची पद्धत - कांद्याचा रस काढून घ्या. त्यात 2 चमचे ताजे कोरफडीचे जेल मिक्स करा.
कसे वापराल?
कापसाच्या मदतीने हे मिश्रण टाळूवर लावा. 15 ते 20 मिनिटे ठेवा आणि नंतर केस धुवा. कांद्याचा उग्र वास जाण्यासाठी सुगंधी शॅम्पू वापरू शकता.
कढीपत्ता आणि खोबरेल तेल मास्क
कढीपत्त्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अमिनो ॲसिड असतात, जे केसांचे फॉलिकल्स मजबूत करतात.
बनवण्याची पद्धत - मूठभर कढीपत्ता खोबरेल तेलात टाकून तेल थोडे गरम करा . तेल कोमट झाल्यावर कढीपत्ता बारीक करून त्याची पेस्ट तेलातच मिक्स करा.
कसे वापराल?
या तेलयुक्त मास्कने केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करा. 1 तासानंतर केस धुवून घ्या.
केस गळती रोखण्यासाठी टिप्स
पावसात केस ओले झाले असतील, तर ते लगेच घरगुती किंवा सौम्य शॅम्पूने धुवून वाळवा. पावसाच्या पाण्यात असलेले प्रदूषण केसांचे नुकसान करते.
ओले असताना केसांची मुळे अत्यंत नाजूक असतात. केस पूर्ण वाळल्यावरच रुंद दातांच्या कंगव्याने विंचरावे.
पावसाळ्यात केस कमकुवत असतात, त्यात ड्रायरच्या गरम हवेमुळे ते अधिकच कोरडे होऊन तुटू शकतात.

