Prepare time: 25 Minutes Cook: 20 Minutes Ready in: 45 Minutes
Ingredients
- १ कप बेसन
- २ टेबलस्पून तांदळाचे पीठ
- ½ कप भाजलेले शेंगदाणे
- ½ कप सुके खोबरे
- १ टेबलस्पून गोडा मसाला
- कांदा बारीक चिरलेला
- हिरव्या मिरच्या
- आले-लसूण पेस्ट
- धणे-जिरे पूड
- तीळ
- गूळ
- चिंचेचा कोळ
- हळद
- लाल तिखट
- तेल
- मीठ
- पाणी
Directions
- सर्वप्रथम भाजलेले शेंगदाणे आणि सुके खोबरे जाडसर कुटून घ्या.
- कढईत तेल गरम करून कांदा, हिरवी मिरची आणि आले-लसूण पेस्ट परता.
- त्यात हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड आणि गोडा मसाला घालून हलके परता.
- त्यात कुटलेले शेंगदाणे-खोबरे, तीळ, गूळ, चिंचेचा कोळ आणि मीठ घाला.
- सर्व मिश्रण २-३ मिनिटे परतून घ्या. शेवटी कोथिंबीर घालून सारण बाजूला ठेवा.
- आवरणासाठी बेसन, तांदळाचे पीठ, हळद, लाल तिखट आणि मीठ एकत्र करा.
- त्यात पाणी घालून गाठी न राहता पातळसर मिश्रण तयार करा. त्यात १ टेबलस्पून तेल घाला.
- कढई गरम करून त्यात हे मिश्रण ओतत सतत ढवळा. मिश्रण घट्ट होऊन कढई सोडू लागले की गॅस बंद करा.
- तयार बेसनाचे मिश्रण तेल लावलेल्या ताटावर पातळ थरात पसरवा.
- त्यावर तयार केलेले शेंगदाणे-खोबऱ्याचे सारण समान पसरवा.
- एक टोकापासून घट्ट रोल तयार करा. रोल थोडा थंड झाल्यावर त्याचे मध्यम आकाराचे तुकडे कापा.
- तयार मासवडीवर थोडी कोथिंबीर आणि खोबरे घालून सर्व्ह करा. हवे असल्यास वड्या हलक्या तेलात तव्यावर भाजूनही घेऊ शकता

