Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोकणच्या मातीत रंगणार परब कुटुंबाचा गणेशोत्सव

कोकणच्या मातीत रंगणार परब कुटुंबाचा गणेशोत्सव

णेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि महाराष्ट्रात सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. कोकणातल्या गणेशोत्सवाला एक वेगळंच महत्त्व आहे. घराघरात बाप्पाचं स्वागत, पारंपरिक पूजा, आरती, भजन आणि गावच्या वातावरणात होणारा उत्सव हा कोकणच्या गणेशोत्सवाचा खास भाग आहे.

याच पारंपरिक आणि उत्साही वातावरणाची झलक आता 'सनई चौघडे' मालिकेतही पाहायला मिळणार आहे. यावर्षी 'परब' कुटुंब गणपतीच्या उत्सवासाठी गावी जाणार आहे. त्यांच्यासोबत खानोलकर कुटुंबातील काही सदस्यही गावात पोहोचणार आहेत.

हरतालिकेचं पूजन, कार्यशाळेतून गणपतीचं आगमन, चार मुलींच्या हातून बाप्पाचं आगमन, गावातली आरती, डबल बारी भजन, गौरीचं आगमन आणि पारंपरिक पद्धतीने होणारं गणपती विसर्जन अशा अनेक प्रसंगांमधून कोकणातला गणेशोत्सव प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. यावेळी गावातील मंडळी डोक्यावरून गणपती घेऊन मिरवणुकीत सहभागी होताना दिसतील.

या गणेशोत्सवाच्या शूटिंगचा अनुभव सांगताना शर्वरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री चिन्मयी साळवी म्हणाली , "माझ्यासाठी हा अनुभव खूपच खास आहे. मी पहिल्यांदाच कणकवलीला गेले होते आणि मला माझ्याच गावी आल्यासारखं वाटलं. माझं गाव संगमेश्वर असल्यामुळे इथला दरवळ, शेणी-चुलीचा वास आणि गावचं वातावरण खूप आपलंसं वाटलं. शूटिंगचं काम खूप होतं, पण अजिबात स्ट्रेस किंवा हेक्टिक वाटलं नाही. गणपतीच्या सुट्टीला गावी आल्यासारखं वाटलं, खूप मजा-मस्ती करत आम्ही शूटिंग एन्जॉय केलं. सध्या आम्ही परब कुटुंबाच्या गावच्या घरी आलोय. गणपतीसाठी सुट्टीचा अर्ज घेऊन चाकरमणी जसे गावी जातात, अगदी तसेच आम्ही सगळे गावी आलोय. यामध्ये खानोलकर कुटुंबातलेसुद्धा काही मेंबर्स आहेत, त्यामुळे पुढे खूप इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळणार आहेत. त्याबद्दल जास्त रिव्हील करू शकत नाही. पण प्रेक्षकांना हा ट्रॅक नक्कीच खूप आवडेल! कोकणातला पाऊस म्हणजे कधीही सुरू होतो आणि कधीही थांबतो. त्यामुळे आमचं शूटिंग थोडं हवामानावर अवलंबून होतं. टीम खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करत होती. पाऊस आला तर त्यानुसार सिक्वेन्स किंवा लोकेशन बदलून शूटिंग मॅनेज केलं.

कलाकारांसोबत टेक्निकल टीम, मेकअप, कॉस्च्युम, कॅमेरा, लाईट्स अशी मोठी टीम आणि सगळ्यांनी मिळून खूप छान पद्धतीने काम केलं. आउटडोअर शूट असल्यामुळे दिवस बराच मोठा असतो. साधारण 12 ते 15 तास काम होतं आणि कधी कधी त्यापेक्षाही जास्त वेळ जातो. पावसामुळे अर्थातच काही अडचणी येतात. कधी लोकेशनवर पोहोचणं, कधी कंटिन्युइटी मेंटेन करणं, तर कधी अचानक पाऊस आल्यामुळे टेक थांबवावा लागतो. पण टीम इतकी को-ऑपरेटिव्ह आहे की त्या अडचणीही एन्जॉय करतच पार पडल्या. शूटिंगचं शेड्यूल खूप पॅक्ड असल्यामुळे फारसं फिरायला वेळ मिळाला नाही, पण कामाच्या मधून आम्ही भरपूर एन्जॉय केलं. आमचा शेवटचा दिवस बीचवर शूटिंगचा होता आणि त्या दिवशी आम्ही सगळ्यात जास्त धमाल केली. तिथलं जेवण इतकं भारी होतं आणि भजन, आरती, डबल बारी ठेवली होती, त्यात तर पूर्ण युनिटने खूप एन्जॉय केलं. आम्ही अक्षरशः पहाटे पाच वाजेपर्यंत नाचलो आणि दुसऱ्या दिवशी साडेआठचा कॉल टाइम असूनही सगळे फुल एनर्जीमध्ये होते. अशीच धम्माल-मस्ती करत, फुल एनर्जीने आम्ही हे संपूर्ण शूट केलंय आणि ही एनर्जी नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, याची मला खात्री आहे."

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar