नवी दिल्ली जंतर मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनानला जगभरातून पाठींबा मिळत आहे. मोठ्या प्रमाणात कलाकार मंडळी विद्यार्थ्यांना सपोर्ट करत आहेत. नुकतंच बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
सलमानने विद्यार्थी आंदोलनाला पाठींबा देत आणि यावर आपली सविस्तर प्रतिक्रिया देत सकारात्मक निर्णयाची आशा व्यक्त केली आहे. ही पोस्ट करताना त्याने शालेय जीवनातील फोटो शेअर केला आहे. Salman Khan Student Protest
पोस्टमध्ये सलमान म्हणतो की, "हे इतकं शांततापूर्ण आंदोलन होतं, पण त्याला हिंसक वळण मिळालं हे पाहून माझं मन खूप दुखावलं आहे. या संपूर्ण गदारोळात ज्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुखापत झाली, त्यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटत आहे. पेपरफुटी हा अत्यंत गंभीर विषय आहे, आणि आपल्या देशातील तरुण पिढी एका चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आली आहे, तसेच पालकांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे, हे पाहून मला मनापासून आनंद झाला."
पुढे तो म्हणतो की,"या मुलांनी दाखवलेली जिद्द, प्रामाणिकपणा आणि शिक्षणाची ओढ खरंच कौतुकास्पद आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणं हाच योग्य मार्ग आहे. ही पिढी नक्कीच भारताचे नाव जगात मोठे करेल. हा विषय केवळ विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेमधील आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने या आंदोलनाचा गैरफायदा घेऊ नये किंवा ते हायजॅक करू नये. याचे सर्व श्रेय फक्त आणि फक्त देशातील तरुणांनाच मिळाले पाहिजे. मला विश्वास आहे की सरकारही त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि यातून सकारात्मक निर्णय निघेल."
"दरवर्षी शिक्षण हाच देशातील सर्वात मोठा ट्रेंड बनला पाहिजे. देशात अशी व्यवस्था निर्माण व्हावी की परदेशातील लोकांनी अभ्यास करण्यासाठी भारतात आले पाहिजे आणि भारत जगाचे मुख्य एज्युकेशन हब बनले पाहिजे."

