Prepare time: 10 minCook: 20 minsReady in: 25-30 mins
Ingredients
- चिरलेला पालक - 2 कप
- बेसन - 1 कप
- तांदळाचे पीठ - 2 चमचे
- चिरलेला कांदा - 1
- हिरव्या मिरच्या - 2
- आलं लसूण पेस्ट - 1
- हळद - 1/2 चमचा
- लाल तिखट - 1 चमचा
- धणे जिरे पूड - 1 चमचा
- हिंग - चिमूटभर
- मीठ - चवीनुसार
- चिरलेली कोथिंबीर
- तेल - तळण्यासाठी
Directions
- पालक स्वच्छ करून त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्या.
- यानंतर पालक एका मोठ्या भांड्यात घ्या.
- त्यात बेसन, तांदळाचे पीठ, कांदा, हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धणे जिरे पूड, हिंग, मीठ आणि कोथिंबीर घालून एकजीव करून घ्या.
- कढईत तेल गरम करा.
- तेल मध्यम आचेवर गरम झाल्यावर त्याचे लहान लहान वडे करून घ्यावेत.
- तयार वडे तेलात सोडा आणि सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यावेत.
- तळलेले वडे टिश्यू पेपरवर काढा.
- तयार पालक वडे हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

