Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लग्नाचे आमिष दाखवून महिला डॉक्टरची 37 लाखांची फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून महिला डॉक्टरची 37 लाखांची फसवणूक

सई : लग्नाचे आमिष दाखवून मॅट्रिमोनियल साइटद्वारे महिला डॉक्टरशी ओळख वाढवून तिची फसवणूक केल्याचा प्रकार वसईत उघडकीस आला आहे. याप्रकरणी वालीव पोलिसांनी सुभाष सातपुते (32) याला अटक केली आहे.

आरोपीने आपण अभियंता असून वार्षिक 37 लाख रुपये उत्पन्न असल्याचे सांगून महिला डॉक्टरचा विश्वास संपादन केल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीने जून महिन्यात मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून सातपुते याची 30 वर्षीय महिला डॉक्टरशी ओळख झाली. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या नावांनी अनेक बनावट इन्स्टाग्राम खाती तयार करून डॉक्टरशी संपर्क साधल्याचा आरोप आहे. संभाषणातून विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. दरम्यान, लग्नापूर्वी लैंगिक सुसंगतता तपासण्यासाठी एका 'प्लेबॉय'सोबत शारीरिक संबंध ठेवण्याची अट त्याने डॉक्टरसमोर ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. यासाठी त्याने एका व्यक्तीचा मोबाइल क्रमांक डॉक्टरला दिला.

आरोपीच्या सांगण्यावरून डॉक्टरने त्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध आले. या घटनेचा व्हिडिओही डॉक्टरने आरोपीच्या सांगण्यावरून रेकॉर्ड करून त्याला पाठविल्याचा आरोप आहे. यानंतर सातपुते याने डॉक्टरशी लग्न करण्यास नकार दिला. तसेच, तिच्याशी लग्न केल्यास तीन महिन्यांत आपला मृत्यू होईल, असा दावा केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे संशय आल्याने डॉक्टरने चौकशी केली असता, ज्या व्यक्तीला 'प्लेबॉय' म्हणून तिच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते, ती व्यक्ती दुसरी कोणी नसून सुभाष सातपुतेच असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर डॉक्टरने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बलात्कार, फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून सातपुते याला अटक केली आहे. आरोपीने वापरलेली कथित बनावट सोशल मीडिया खाती, मोबाइल क्रमांक तसेच व्हिडिओसंदर्भातील बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar