आमदारांच्या पीए, वाहन चालकांच्या मानधनात वाढ
1 ऑगस्टपासून 10 हजाराची वाढ लागू
18/8/2026 22:18:35
घाटकोपर स्थानकात एका व्यक्तीने ओव्हरहेट वायरवर मारली उडी
मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने
18/8/2026 18:45:3
सिंदखेडराजा मधील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला 50 कोटी देण्याचा निर्णय
प्रत्यक्ष स्मारकाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून स्मारकाच्या कामाला तत्काळ सुरुवात करणार
18/8/2026 18:30:23
इंडिया विरुद्ध श्रीलंका कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला
भारताला विजयासाठी 6 विकेट्स, तर श्रीलंका संघाला विजयासाठी 288 धावांची गरज
18/8/2026 18:30:5
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला बारामती दौऱ्यावर
विद्याप्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला मोदी राहणार उपस्थित
18/8/2026 18:29:47
वसतिगृहांच्या समस्यांवर स्यू-मोटो जनहित याचिका
मुलींच्या वसतिगृहांतील असुविधांची मुंबई उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल
वसतिगृहांची पाहणी आणि अहवाल तयार करण्याचे निर्देश
पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला
18/8/2026 17:19:27
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच आंदोलन
आदिवासी विद्यार्थ्यांचा आयुक्त कार्यालयाचा घेराव
विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी आक्रमक
18/8/2026 17:15:13
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली
उद्या दुपारी 4 वाजता कपिल सिब्बल युक्तिवाद संपवणार
18/8/2026 16:5:42
विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला - कपिल सिब्बल
अध्यक्षांनी अधिकाराची मर्यादा ओलांडली - कपिल सिब्बल
पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोगाने प्रश्न उपस्थित केले - कपिल सिब्बल
घेतलेले निर्णय कायद्याच्या बाहेरचे - कपिल सिब्बल
18/8/2026 15:13:21
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू
कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तीवाद
18/8/2026 14:34:24
मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा रद्द
प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने मराठवाड्याचा दौरा रद्द
18/8/2026 14:23:39
ऋषभ पंतचा कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार मारण्याचा विक्रम
100 षटकार मारणारा पंत पहिला भारतीय क्रिकेटपटू
कसोटीत 100 षटकार मारणारा ऋषभ पंत तिसरा जागतिक क्रिकेटपटू
18/8/2026 14:2:4
नागपूरच्या 12 शाळांना आणि तीन सरकारी शाळांना धमकी
12 शाळा आणि तीन सरकारी शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
खलिस्तानी संघटनेच्या नावे मेलवरून धमकी, तपासानंतर शाळेत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही
18/8/2026 13:7:29
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हिंजवडीत पोहोचले
आदित्य ठाकरेंकडून हिंजवडीतील रस्त्यांची पाहणी
पक्षाचे पदाधिकारी, अधिकारी तसेच स्थानिकांशी साधत आहेत संवाद
18/8/2026 12:28:53
कोल्हापूर पोलिसांकडून 1.75 कोटींची अवैध दारू जप्त
कारवाईत एकूण 1.95 लाखांचा मुद्देमाल जप्त
गोव्यातून मध्य प्रदेशकडे जाणारा दारू साठा जप्त
18/8/2026 12:25:44
सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली विनोद तावडेंची भेट
मुनगंटीवारांनी तावडेंना दिल्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा
18/8/2026 12:23:35
आजपासून बेस्ट कामगारांचा बेमुदत उपोषणाचा इशारा
विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातील कर्मचारी यांचा उपोषणाचा इशारा
युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी 18 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाची केली घोषणा
18/8/2026 12:14:9
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन
मुंबई हायकोर्टाकडून सचिन अंदुरेला जामीन मंजूर
सचिन अंदुरेला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
18/8/2026 12:0:26
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून आंदोलनाची घोषणा
1 सप्टेंबरला आम्ही मुंबईला निघणार - लक्ष्मण हाके
ओबीसींच्या बाजूने मुख्यमंत्री, नेते बोलत नाहीत - लक्ष्मण हाके
18/8/2026 11:48:0
मुंबई - आझाद मैदानावर होमिओपॅथी डॉक्टरांचे आंदोलन
महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलमधील नोंदणी जलद करण्याची मागणी
आझाद मैदान ते मंत्रालय असे पायी आंदोलन, पोलिसांनी गेटवरच थांबवले
18/8/2026 11:45:7
विनोद तावडे उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रभारी
2027 मध्ये उत्तरप्रदेशमध्ये होणार विधानसभेची निवडणूक
काल सरचिटणीस पद दिल्यानंतर आज आणखी एक मोठी जबाबदारी
18/8/2026 11:5:31
16 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी बारामती दौऱ्यावर - शरद पवार
विद्या प्रतिष्ठान प्रेरानास्थळ वस्तूचे उद्घाटन करणार - शरद पवार
18/8/2026 10:58:44
पुण्यात आदिवासी विद्यार्थी आश्रमगृहात विद्यार्थ्यांच आमरण उपोषण
राज्यातील प्रत्येक आदिवासी आश्रम शाळेचा 10 कोटी रुपये विमा उतरवावा
18/8/2026 10:40:12
मुंबईत छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक उभारण्याबाबत आज बैठक
संध्याकाळी 5 वाजता विधान भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक
उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार, मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार
18/8/2026 10:26:44
शासकीय कंत्राटदारांचे आझाद मैदानात आंदोलन
आज आणि उद्या आझाद मैदानावर सुरु राहणार आंदोलन
शासकीय विभागांकडील 86 हजार 662 कोटींची देयके प्रलंबित
प्रलंबित बिलांचा प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन
18/8/2026 9:9:10
आज आदित्य ठाकरेंचा पुण्यातील हिंजवडीचा दौरा
वाहतूक कोंडी, खड्डे आणि इतर समस्या आदित्य ठाकरे जाणून घेणार
उद्योग मंत्र्यांच्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांचा पुन्हा एकदा चाकणनंतर हिंजवडी दौऱ्यावर
18/8/2026 9:3:38
हिंगोली - शाळेत मद्यपान करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन
अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच मुख्याध्यापक निलंबित
मुख्याध्यापक विनोद कटकेवर निलंबनाची कारवाई
18/8/2026 8:38:53
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज सुनावणी
ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आजही युक्तिवाद करणार
आज दुपारी 2 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार
अंतिम टप्प्यात शिंदेंच्या वकिलांच्या युक्तिवादाकडेही लक्ष
18/8/2026 8:34:12

