Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Live Update : सचिवांना काळे फासल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या तिघांना अटक

Live Update : सचिवांना काळे फासल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या तिघांना अटक

सचिवांना काळे फासल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या तिघांना अटक

नवी मुंबई पोलीस उपायुक्त अमित काळेंची माहिती

संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सचिवांना भेटायला आल्यानंतर घडली घटना

11/9/2026 14:33:26


अजय बारस्करांची मनोज जरांगेंविरोधात तक्रार

अजय बारस्कर तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले

मनोज जरांगे लोकांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचा अजय बारस्करांचा आरोप

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात बारस्करांची जरांगेविरोधात तक्रार

11/9/2026 14:15:25


एमपीएससीविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक

एमपीएससी सचिव महेंद्र हरपाळकरांच्या तोंडाला फासले काळे

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हरपाळकरांच्या तोंडाला फासले काळे

11/9/2026 13:1:33


मनोज जरांगे-पाटील यांना हात लावल्यास अख्खा महाराष्ट्र इथं येईल - दिपके

मुख्यमंत्र्यांनी यावं आणि जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करावी - अभिजीत दिपके

सरकारने जरांगे-पाटील यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात - अभिजीत दिपके

11/9/2026 12:3:16


अभिजीत दिपके यांनी घेतली मनोज जरांगे-पाटील यांची भेट

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके अंतरवाली सराटीमध्ये

जंतरमंतरवरील आंदोलनात जरांगे पाटील यांनी दिल्लीत जात दिला होता पाठिंबा

अभिजीत दिपके यांच्याकडून जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस

तुम्ही कितीही दिवस बसलात तरीही सरकारला फरक पडणार नाही - दिपके

मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 14 वा दिवस

11/9/2026 11:58:2


अन्नातून विषबाधा होऊन चिमुरड्याचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू खिचडी खाल्यानंतर मृत्यू

खिचडी खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांना त्रास

कन्नड तालुक्यातील चिंचोली-निंबाजी परिसरातील घटना

11/9/2026 11:40:32


नागपुरात काळ्या, पिवळ्या मारबत उत्सवात असुरी नृत्य, हजारो लोकांची उपस्थिती

पिवळी मारबतची नागपुरात 145 वर्षांची परंपरा

पिवळी मारबत मिरवणूक पाहण्यासाठी फ्रान्स, इटली, नॉर्वे आदी देशांचे दूत उपस्थित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील नागपुरात दाखल होत आहेत

पोलीस आयुक्तांनी डीजेबंदी केल्यामुळे ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण

11/9/2026 11:31:24


छत्रपती संभाजीनगरमध्ये एमपीएससी पेपरफुटीविरोधात मोर्चा

आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारांचा मोर्चा

विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा धडकणार

शेकडोंच्या संख्येने उमेदवार शिस्तीत मोर्चात सहभागी

एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणीसाठी मोर्चा

11/9/2026 10:53:28


पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, चार ट्रक पनीर जप्त

गणेशोत्सवाआधी अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

चार ट्रक पनीर आणि खवा जप्त, बुधवार पेठेतील कारवाई

11/9/2026 10:16:9


मुंबई - गोवा महामार्गावर माणगावजवळ प्रचंड वाहतूक कोंडी

कोकणवासीय गणपती उत्सवासाठी निघाल्याने वाहनांच्या रांगा

वाहतूक कोंडीमुळे कोकणवासीयांचे प्रवासाच्या सुरुवातीलाच हाल

11/9/2026 9:25:31


मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावल्याने शुक्रवारी रात्री त्यांना सलाईन लावली

जरांगे-पाटील यांच्या अंतरवाली सराटीमधील उपोषणाचा 14 वा दिवस

उद्या दुपारी 12 वाजता जरांगे-पाटील मराठा नेत्यांसोबत चर्चा करणार

मुंबईत आंदोलनाला जाण्याबाबत जरांगे-पाटील उद्या (12 सप्टेंबर) निर्णय घेणार

11/9/2026 9:6:25


भारत आणि रशियामध्ये सुखोई-57 विमानांच्या व्यवहाराचा करार होण्याची शक्यता

रशियाचे अध्यक्ष पुतिन भारतात दाखल, ब्रिक्स परिषदेचे निमित्त

रशियाकडून भारत 75 सुखोई विमान खरेदी करण्याची शक्यता

हा व्यवहार 1 लाख कोटींचा असण्याची शक्यता

11/9/2026 9:1:11


पिवळ्या मारबत मिरवणुकीसाठी नागपूर सज्ज, थोड्यात वेळात मिरवणूक निघणार

नागपूरमध्ये पिवळ्या मारबत मिरवणुकीची 145 वर्षांची परंपरा

मारबत मिरवणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागुपरात

11/9/2026 8:46:42


बीडच्या पाटोद्यात भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत

भटक्या कुत्र्यांचा चिमुरडीवर हल्ला, जखमी मुलीवर उपचार सुरू

भटक्या कुत्र्यांचा हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद

11/9/2026 8:24:16


अमेरिका-इराणमधील युद्ध तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरात 5 टक्क्यांची वाढ

कच्चे तेल आता 106 बॅरलवर गेल्याने पेट्रोलच्या किमती वाढण्याची भीती

11/9/2026 8:16:59


गणेशोत्सवासाठी पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय

गणेशोत्सव काळात पुण्यात जड वाहनांना प्रवेश बंदी

भाविकांच्या सोयीसाठी मेट्रो प्रशासन, जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचे निर्णय

11/9/2026 8:4:0


नवी दिल्लीत 12 आणि 13 सप्टेंबर रोजी ब्रिक्स परिषद

ब्रिक्स परिषदेसाठी नवी दिल्ली सज्ज

चीनचे अध्यक्ष जिनपिंग उद्या दिल्लीत दाखल होणार

तब्बल 7 वर्षांनंतर चीनचे अध्यक्ष दिल्ली दौऱ्यावर

11/9/2026 7:59:44

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar