Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Live Update : सरकारच्या हातात बंदुका असतील तर आमच्या हातात तिरंगा आहे - उद्धव ठाकरे

Live Update : सरकारच्या हातात बंदुका असतील तर आमच्या हातात तिरंगा आहे - उद्धव ठाकरे

रकारच्या हातात बंदुका असतील तर आमच्या हातात तिरंगा आहे - उद्धव ठाकरे

तुषार गांधीही शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी

24/7/2026 16:44:43


दादरच्या शिवाजी पार्कवर तिरंगा रॅलीचे आयोजन

आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

हजारोंच्या संख्येने तरुण शिवाजी पार्कवर उपस्थित

तिरंगा हातात घेत विद्यार्थी आंदोलनात सहभागी

24/7/2026 16:18:48


सीजेपीच्या समर्थनार्थ पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन

लाल महाल ते जिल्ह्याधिकारी कार्यालय दरम्यान निघणार मोर्चा

मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक आंदोलनात सहभागी

24/7/2026 15:38:31


सीजेपीच्या तीन पैकी दोन मागण्या पूर्ण - सौरव दास

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून सरकारने वेळ मागितला - आशुतोष रांका

सरकारने राजीनामा घेतला नाही तर सीजेपीचे आंदोलन तीव्र होणार - आशुतोष रांका

24/7/2026 14:50:36


सीजेपी आणि केंद्र सरकार यांच्यातील बैठक संपली

सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास,आशुतोष रांका बैठकीत उपस्थित

जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत सीजेपीची बैठक

24/7/2026 14:47:34


पेपरफुटी सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी

पुढच्या आठवड्यात संसदेत सादर होणार विधेयक

24/7/2026 14:38:8


अतिरिक्त पोलीस आयुक्त देशमाने राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर

रविवारच्या मोर्चानिमित्त अतिरिक्त पोलीस आयुक्त पोहोचले ठाकरेंच्या भेटीला

24/7/2026 14:9:16


राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात

कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

राज्यसभेत वंदे मातरम् विधेयक सादर

विधेयक सादर होत असतानाही विरोधकांकडून घोषणाबाजी सुरू

24/7/2026 14:6:7


ऊर्जा विभागाच्या प्रकाशगड कार्यालयाला आग

आग लागल्याने कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले

प्रकाशगडमध्ये महापारेषण, महावितरण आणि महानिर्मितीची कार्यालये

24/7/2026 14:4:20


सीजेपी आणि सरकारमधील बैठकीची जागा बदलली

सीजेपीचे प्रतिनिधी आणि जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंहमधील बैठकीला सुरुवात

दिल्लीच्या व्हीपी हाऊसमधील रूम नंबर 4004 मध्ये बैठक सुरु

24/7/2026 13:28:38


प्रधानांनी राजीनामा दिल्याशिवाय कोणतीही चर्चा नाही - राहुल गांधी

पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी - राहुल गांधी

नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधक लोकसभेत आणि राज्यसभेत आक्रमक

24/7/2026 12:27:41


लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून विरोधकांनी घातला गोंधळ

सोमवारी दि. 27 जुलै रोजी 11 वाजेपर्यंत स्थगित

24/7/2026 12:21:3


राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित

विरोधक केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम

24/7/2026 12:20:4


सीजेपीच्या भेटीआधी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंह अमित शहांच्या निवासस्थानी

सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत होणार्‍या बैठकीसाआधी केंद्रीय मंत्री नड्डा आणि जिंतेंद्र सिंह हे अमित शहांच्या भेटीला

सोमवारी दि. 27 जुलै रोजी 11 वाजेपर्यंत स्थगित

24/7/2026 12:13:49


खासदार छत्रपती शाहू महाराज जंतरमंतरवर पोहोचले

खासदार छत्रपती शाहू महाराजांनी घेतली अभिजीत दिपकेंची भेट

24/7/2026 12:11:37


सीजेपीच्या आंदोलनानिमित्त दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

पुढील आदेशापर्यंत अधिकाऱ्यांपासून हवालदारांच्या सुट्ट्या रद्द

दिल्ली पोलीस आयुक्तांचे आदेश

24/7/2026 12:1:55


संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचले

शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला

24/7/2026 11:37:46


लोकसभेनंतर राज्यसभेचे कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या गोंधळानंतर राज्यसभेचे कामकाज थांबवले

24/7/2026 11:14:6


लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित

विरोधकांचे प्रश्नांवर चर्चा करण्याचे सरकारला आवाहन

विरोधकांच्या गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज चालू झाल्यानंतर काही मिनिटच स्थगित

24/7/2026 11:07:57


धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाच पाहिजे, संसद भवन परिसरात आंदोलन

काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी केला निषेध

24/7/2026 10:42:47


आज कॉक्रोच जनता पार्टीचे देशव्यापी आंदोलन

शांततापूर्ण सहभागाचे सीजेपीचे आवाहन

केंद्र सरकार आणि सीजेपीची चर्चा होणार

24/7/2026 9:49:33


सीजेपी आंदोलनावर ठाम तरुणांची जंतरमंतरवर गर्दी

धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम, जंतरमंतरवर गर्दी

24/7/2026 9:22:30


आज कॉक्रोच जनता पार्टी आणि केंद्र सरकारची चर्चा होणार

आज दुपारी 12.30 वाजता सरकारसोबत बैठक

कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळासोबत वरिष्ठ मंत्र्यांची चर्चा

24/7/2026 9:10:47


रेल्वे तिकीट दलालांविरोधात आरपीएफची मोठी कारवाई

4.5 वर्षांत 1,676 गुन्हे दाखल, 2025 मध्ये सर्वाधिक 828 गुन्ह्यांची नोंद

10.50 कोटींहून अधिक किमतीची ई-तिकिटे आणि आरक्षण तिकिटे जप्त

24/7/2026 8:54:26


विद्यार्थ्यांसाठी आदित्य-अमित ठाकरे मैदानात

दादरच्या शिवाजी पार्कात एकत्र येणार

दुपारी 4 वाजता राष्ट्रगीताचा कार्यक्रम होणार

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पार्कात राष्ट्रगीत कार्यक्रम आयोजित

24/7/2026 8:53:31


नाशिकमध्ये पावसाची संसतधार सुरूच

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

गंगापूर धरणातून 13 हजार 932 क्यूसेकने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग

गोदावरी नदीने रात्रीच ओलांडली आहे धोक्याची पातळी, गोदावरीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर

पुराच्या पाण्याची ओळख असलेला दुतोंडया मारुती पाण्याखाली

होळकर पुलाखाली रामकुंड परिसरात 23 हजार 507 क्यूसेकने होतोय विसर्ग

24/7/2026 8:39:55


अखेर 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र यांच्या उपस्थितीत सोडले उपोषण

सोनम वांगचुक यांच्या तीन मागण्या मान्य केल्याने उपोषण सोडल्याची माहिती

24/7/2026 8:35:48

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar