Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Live Update : दिघी शिप बिल्डिंग क्लस्टर प्रकल्प निर्माण करण्यासाठी करार

Live Update : दिघी शिप बिल्डिंग क्लस्टर प्रकल्प निर्माण करण्यासाठी करार

दिघी शिप बिल्डिंग क्लस्टर प्रकल्प निर्माण करण्यासाठी करार

माझगाव डॉक शिप बिल्डर्सआणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्यात करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थित करार संपन्न

महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्राला जागतिक पातळीवर नवी ओळख मिळणार

15/9/2026 15:19:53


मनोज जरांगे पाटलांचा ताफा वडीगोद्री येथे पोहोचला

जरांगेंचा आज पहिला मुक्काम बीडमधील पाटोद्यात

15/9/2026 14:6:6


अकोला - अमरावती महामार्गावर ट्रकला आग

चालक आणि क्लिनरच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता

अमरावतीहून अकोल्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर काही काळ परिणाम

15/9/2026 13:49:33


भाजप आमदार प्रसाद लाड बाप्पाच्या दर्शनासाठी राज ठाकरेंच्या घरी

आमदार प्रसाद लाड पत्नीसह पोहोचले राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी

15/9/2026 13:16:16


लातूरचे प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांची आत्महत्या

संजीव सोनवणे यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती

परळीत संकल्प कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात काम

आत्महत्येपूर्वी सोनवणे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती

15/9/2026 13:14:38


बिहारच्या पाटणामध्ये विद्यार्थी आक्रमक

बीपीएससी परीक्षेत घोटाळा झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

परीक्षा रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा

15/9/2026 13:0:14


नागपुरात एक जण चढला मोबाईल टॉवरवर

नागपुरात सिव्हिल लाईन परिसरात एक जण चढला मोबाईल टॉवरवर

मोबाईल टॉवरवर चढलेल्या तरुणाची पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न

15/9/2026 12:47:6


लालबागच्या राजाला पहिल्या दिवशी आलेल्या दानाची मोजदाद सुरू

पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाला भाविकांचे भरभरून दान

15/9/2026 12:28:44


मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले

मुंबईतील आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी दोनदा नाकारली परवानगी

तिसरा अर्ज केला असून मुंबई पोलीस काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष

15/9/2026 11:30:38


लालबागच्या राजाचे वार्तांकन करताना पोलिसांकडून माध्यमांशी अडवणूक

माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये काहीकाळ तणावाचे वातावरण

मंडळाकडून पासेस दिल्यानंतरदेखील पोलिसांकडून अडवणूक

15/9/2026 11:27:20


नवी मुंबईत हॉटेलमध्ये स्फोट, 2 जण जखमी

नवी मुंबईतील सानपाडामधील हॉटेलमधील घटना

स्फोटामुळे आजूबाजूच्या दुकानांच्या काचा फुटल्याची माहिती

15/9/2026 10:14:26


राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक

दुष्काळी परिस्थितीवर सरकार निर्णय घेण्याची शक्यता

मंत्रालयात आज दुपारी 12 वाजता बैठक

15/9/2026 10:10:17


ऋषी पंचमी निमित्त गोदाघाटावर भाविकांची गर्दी

गोदाघाटावर सुरू असलेल्या सिंहस्थ कामांमुळे भाविकांची गैरसोय

प्रशासनाकडून भाविकांना स्नानासाठी पर्यायी जागेची व्यवस्था

15/9/2026 9:56:15


मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 18 वा दिवस

मोजक्या समर्थकांसह मनोज जरांगेंचा मुंबई गाठण्याचा निर्णय

मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

19 ऐवजी 18 सप्टेंबरलाच आंदोलनाची परवानगी देण्याची मागणी

15/9/2026 9:0:15


मुंबई - गोवा महामार्गावर भीषण अपघात

अपघातग्रस्त टँकरमधून ज्वालाग्राही रसायनाची गळती

कोकणात जाणाऱ्या मार्गिकेवर टँकर उलटला

15/9/2026 8:48:17


शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शिंदेंच्या शिवसेनेचे वकील नीरज कौल युक्तिवाद मांडणार

सरन्यायाधीश सुर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार

15/9/2026 8:46:38


बेळगावात घरातील फ्रिजचा स्फोट झाल्याने भीषण आग, चौघांचा मृत्यू

स्फोटामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी

15/9/2026 8:25:32


दुष्काळाचे सावट दूर होऊ दे, गणरायाकडे रोहित पाटलांचे साकडे

आमदार रोहित पाटलांचा अंजनी ते तासगाव पायी प्रवास

गणरायाला साकडे घालण्यासाठी रोहित पाटलांचा पायी प्रवास

15/9/2026 8:21:27

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar