मंत्र्यांना मिळणारी वृत्तपत्रे, नियतकालिके बंद
सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय
ऑनलाइन सदस्यत्व घेण्याची सूचना
30/7/2026 21:32:4
शेतकरी कर्जमाफीसाठी 7 हजार कोटींच्या वितरणाला मान्यता
सहकार विभागाचा शासन निर्णय जारी
30/7/2026 20:6:23
मुंबई महानगरपालिकेतील 8 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या
डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांची मध्यवर्ती खरेदी खात्यात उपायुक्त म्हणून नियुक्ती
30/7/2026 19:16:36
विदर्भाच्या संघात निवड न झाल्याने तरुणीने जीवन संपवले
संघात निवड न झाल्याने 17 वर्षीय तरुणी होती निराश
30/7/2026 19:16:13
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर
आज रात्रीपर्यंत विकासकामांचा आढावा घेणार
उद्या बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक
30/7/2026 18:47:5
नागपूरमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला
अनेक भागात पाणी साचले
हवामान विभागाकडून नागपुरात ऑरेंज अलर्ट
30/7/2026 18:13:7
हिंगोली जिल्ह्याला रेड अलर्ट
मराठवाड्याला यंदाच्या पावसाळ्यातला पहिला रेड अलर्ट
मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता
प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा
30/7/2026 16:56:38
अनिल परब यांना सत्र न्यायालयात मोठा दिलासा
पालिका अभियंता मारहाण प्रकरणी अनिल परब यांची निर्दोष मुक्तता
अनिल परब यांच्यासह सदानंद परब आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
30/7/2026 16:53:38
नीरज चोप्रा भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत
नीरजसोबतच भारताचे रोहित यादव आणि यश वीर सिंग सुद्धा भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत
भालाफेक स्पर्धेच्या पात्रता फेरीत नीरज चोप्रा पाचव्या स्थानावर राहिला, तर रोहित यादव नवव्या आणि यश वीर सिंग दहाव्या स्थानावर
30/7/2026 15:56:31
लोकसभेत वंदे मातरम् विधेयक पास
राज्यसभेनंतर लोकसभेतही विधेयक पास
लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित
30/7/2026 15:55:4
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी संपली
सीजेआय सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरील आजची सुनावणी संपली
पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
30/7/2026 15:53:59
संसदेत अमित शहांसोबत केंद्रीय गृहसचिव आणि आयबी प्रमुखांची बैठक सुरू
सीजेपीच्या मागणीसंदर्भात बैठकीत चर्चा
30/7/2026 15:37:59
सार्वजनिक परीक्षा विधेयक राज्यसभेत सादर
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सादर केले विधेयक
बुधवारी लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेत सादर
जितेंद्र सिंहांनी विधेयक सादर करताच विरोधकांचा गदारोळ
काँग्रेसच्या काळात अनेक पेपर लीक झाले - केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह
30/7/2026 14:9:5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक
राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा, पियुष गोयल बैठकीला उपस्थित
बैठकीला निर्मला सीतारमण, किरेन रिजिजूही उपस्थित
30/7/2026 13:10:1
नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे व्यक्तीचा मृत्यू, ठाकरे गट आक्रमक
निलेश कोतकर यांचा दुचाकी अपघातात मृत्यू
मयत निलेश यांच्या पत्नीचे नाशिक महापालिकेत ठिय्या आंदोलन
नाशिकमध्ये खड्ड्यामुळे पाचवा मृत्यू
30/7/2026 13:8:6
राज्य सरकारकडून नशामुक्ती अभियानाला सुरुवात
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
उपस्थितांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली नशामुक्त अभिनयाची शपथ
30/7/2026 12:8:40
शेतकऱ्यांना गरज पडली तर आम्ही त्यांच्यासोबत - अभिजीत दिपके
पतंजली उत्पादनांकडे रामदेव बाबांनी लक्ष द्यावे - अभिजीत दिपके
गुंड आणि अत्याचार करणाऱ्यांचे समर्थन करणारे सरकार - अभिजीत दिपके
30/7/2026 11:33:39
पंजाबमधील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन
दिल्लीतील आपच्या कार्यालयावर भाजपचे आंदोलन
पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची भाजपकडून मागणी
दिल्लीतील आपच्या कार्यालयावर भाजपचे आंदोलन
30/7/2026 11:30:37
लोकसभेचे कामकाज सुरु होताच 2 वाजेपर्यंत स्थगित
विरोधकांच्या गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज अवघ्या काही मिनिटात स्थगित
30/7/2026 11:10:39
संसद परिसरात इंडिया आघाडीच्या खासदारांचे आंदोलन
विद्यार्थी आंदोलनावरील कारवाईवरून घोषणाबाजी
30/7/2026 11:3:8
मुंबईकर अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
सोशल मीडियावर व्हिडीओ टाकत सर्व प्रकारच्या फॉरमॅटमधून निवृत्ती
मुंबईकर अजिंक्य रहाणेचा 20 वर्षांचा क्रिकेटमधील प्रवास थांबला
30/7/2026 10:27:22
वसंत डावखरे प्रकरणात उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टाचे समन्स
5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याचे समन्स
2009 लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघांतील प्रकरण
उद्धव ठाकरेंनी प्रचारसभेत डावखरेंच्या दाखवलेल्या व्हिडीओबाबत समन्स
30/7/2026 10:4:8
मुख्यमंत्री कार्यालय एअर इंडिया इमारतीत हलवणार
नरीमन पॉईंटच्या इमारतीत होणार मंत्रिमंडळ बैठक
एअर इंडिया इमारतीत मंत्रिमंडळ हॉल बनवण्याची तयारी
इमारतीच्या 23 व्या महाल्यावर असणार मुख्यमंत्री कार्यालय
कामांचा आज मुख सचिवांच्या उपस्थितीत आढावा
30/7/2026 9:52:21
अमरावती मार्गावर एसटीचा अपघात, एकाचा मृत्यू
अमरावतीतील दर्यापूर-अमरावती मार्गावर एसटी बसची ट्रकला जोरात धडक
एकाचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी असल्याची माहिती
30/7/2026 9:49:27
नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा दुर्देवी मृत्यू
अंबड एमआयडीसीतील एक्सलो पॉईंट परिसरात चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकीला अपघात
अपघातात 40 वर्षीय नीलेश कोतकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू
गेल्या काही दिवसांत नशिकमधील खड्ड्यांमुळे झालेला पाचवा मृत्यू
30/7/2026 9:20:56
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
सरन्यायाधीश सुर्यकांत, जॉयमला बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी
सर्वोच्च न्यायालयात गेल्या 4 वर्षांपासून प्रकरण प्रलंबित
30/7/2026 8:35:0
नाशिकच्या दिलीप गावितने कॉमनवेल्थ गेम्स 2026मध्ये पटकावले सुवर्ण पदक
पुरुषांच्या 100 मीटर टी-47 अंतिम शर्यतीत मिळाली दोन पदके
भारताच्या मोहम्मद बासिलनेही याचा शर्यतीत पटकावले रौप्य पदक
30/7/2026 8:29:50

