Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Live Update : मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर गोंदियातील सौंदड येथे वाहतूक कोंडी

Live Update : मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर गोंदियातील सौंदड येथे वाहतूक कोंडी

मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर गोंदियातील सौंदड येथे वाहतूक कोंडी

गोंदिया - सौंदड ते सावंगी दरम्यान महामार्गावरील वाहतूक ठप्प

सौंदड रेल्वे चौकीच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा

30/8/2026 22:25:0


मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला यशवंत सेनेचा पाठिंबा

मनोज जरांगे यांचा काठी-घोंगडी देऊन सत्कार

पारंपरिक पद्धतीने नृत्य सादर करत यशवंत सेनेची रॅली

30/8/2026 20:52:3


रेतीबंदर गणेश घाटाजवळ पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

ठाकूरपाडा येथील तीन तरुणांचा कळवा खाडीत बुडून मृत्यू

ठाणे महापालिकेच्या जवानांकडून तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात यश

30/8/2026 17:39:59


शिंदेंच्या परभणीतील मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ

सभास्थळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी

30/8/2026 16:0:41


शेतकरी मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे परभणीत पोहोचले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचले

30/8/2026 15:22:3


डीजेविरोधात पुणेकरांचे आंदोलन

पुण्यातील गुडलक चौकात पुणेकरांचे आंदोलन

डीजे आणि साऊंड सिस्टमला पुणेकरांचा विरोध

यंदाच्या गणेशोत्सवात लाऊडस्पीकर चालणार नाही, अशी पुणेकरांची भूमिका

30/8/2026 15:18:31


मनोज जरांगेंना आमदार बच्चू कडूंचा फोन

आमदार बच्चू कडू यांच्याकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न

30/8/2026 14:4:4


उपमुख्यमंत्री शिंदे परभणीतील मेळाव्यासाठी निघाले

ठाण्यातून उपमुख्यमंत्री शिंदे परभणीकडे निघाले

30/8/2026 12:48:2


खासदार संजय जाधव परभणीतील मेळावास्थळी पोहोचले

जरांगेंच्या अल्टिमेटमनंतर खासदार संजय जाधव यांचा कार्यक्रम रद्द करण्यास नकार

30/8/2026 12:10:29


जरांगेंच्या इशाऱ्यानंतरही परभणीतील शेतकरी मेळावा होणार

परभणीतील शेतकरी मेळाव्याचा कार्यक्रम रद्द होणार नाही - खासदार संजय जाधव

30/8/2026 11:54:4


एकनाथ शिंदेंचा परभणीतील शेतकरी मेळावा रद्द

मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मेळावा रद्द

मेळावा घेतल्यास मी तिथे येणार, असा जरांगेंनी दिलेला इशारा

खासदार संजय जाधवांना जरांगेंनी मेळावा रद्द करण्यास सांगितल्यानंतर मेळावा रद्द

30/8/2026 11:3:59


खासदार कल्याण काळे मनोज जरांगेंच्या भेटीला

कल्याण काळे यांच्यासह आमदार संदीप क्षीरसागरही जरांगेंच्या भेटीला पोहोचले

30/8/2026 9:58:42


एकनाथ खडसेंच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार पोहोचले जळगावात

एकनाथ खडसेंच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त शरद पवार जळगावात आले

30/8/2026 9:45:24


नागपुरातील जापानी गार्डन रोडवर भीषण अपघात

मॉर्निंग वॉक करत असताना एका व्यक्तीला वाहनाला चिरडले

30/8/2026 9:30:29


मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस

मागण्या मान्य न झाल्यास 12 तारखेला मुंबई आंदोलनाची तारीख ठरणार

सरकारकडून पुन्हा एकदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीची शक्यता

आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी सरकार आणि जरांगे यांच्यात तोडगा निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष

30/8/2026 8:32:2


शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा आज 75 वा वाढदिवस

एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

आज सकाळी 11 वाजता अमृत महोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार

या सोहळ्याला विविध पक्षांमधील महत्त्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार विनोद तावडे उपस्थित राहणार असल्याची माहिती

30/8/2026 8:32:2

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar