नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे आणि दीपक केसरकर आमनेसामने
नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
वरळी कोळीवाड्यात आदित्य ठाकरेंची उपस्थिती
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकरही वरळी कोळीवाड्यात उपस्थित
27/8/2026 17:43:42
चालकांनी मराठी शिक्षण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ - मुख्यमंत्री
टक्सी - रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदावाढ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चालकांवर एका वर्षात कोणतीही कारवाई होणार नाही - मुख्यमंत्री फडणवीस
27/8/2026 17:7:31
14 ऑगस्टचा शासन निर्णय रद्द केला - आदिवासी मंत्री अशोक उईके
उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर आदिवासी मंत्र्यांची मोठी घोषणा
वैधता असल्याशिवाय प्रमाणपत्रे देऊ नये असे सांगण्यात आले - आदिवासी मंत्री
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार - आदिवासी मंत्री अशोक उईके
27/8/2026 16:53:53
पिंपरी-चिंचवडच्या वाकडमध्ये हुंडाबळीची घटना
उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेने जीवन संपवलं
पती, सासू आणि सासरे यांच्यासह एकाला अटक
27/8/2026 15:24:57
सोलापुरात एमएसईबीच्या टॉवरवर एक व्यक्ती चढला
सकाळी 11 वाजल्यापासून व्यक्ती टॉवरवर चढलाय
27/8/2026 14:4:27
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मोर्चा
क्लस्टर योजनेविरोधात राष्ट्रवादीचा क्लस्टर कार्यालयावर मोर्चा
ठाण्यातील तीन हात नाका ते कशीश पार्कपर्यंत मोर्चा
जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा मोर्चा
27/8/2026 12:58:43
कानपूरमध्ये प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात
एका प्रशिक्षणार्थीसह वैमानिका मृत्यू,
एक जण गंभीर असल्याची माहिती
गंगा नदीच्या काठई नत्था पुरवा गावाजवळ दुर्घटना
27/8/2026 12:51:40
छत्रपती संभाजीनगरमध्ये बेरोजगारीच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एल्गार मोर्चा
छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकापासून मोर्चाला सुरुवात
राजेश टोपे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा मोर्चा
27/8/2026 12:36:45
MPSC पेपरफुटी प्रकरणातील आरोपी सुनील गाढवेंचे रोहित पवारांसोबत फोटो - नवनाथ बन
सुनील गाढवे रोहित पवारांचा उजवा हात
सरकार कुणालाही पाठिशी घालत नाही, मात्र रोहित पवारांकडून राजकारण सुरू
MPSC पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक
27/8/2026 12:31:40
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकरांचं मंत्रालयासमोर आंदोलन
मंत्रालयाच्या समोरील मंत्र्यांच्या बंगल्याजवळ आंदोलन
पोलिसांसडून रविकांत तुपकरांसह कार्यकर्त्यांची धरपकड
27/8/2026 12:19:8
नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 80 पर्यटक अडकलेत - गिरीश महाजन
80 पैकी जळगावातील 4 पर्यटकांशी संपर्क झाला - महाजन
80 पैकी 57 पर्यटक रिचा टूर्सकडून नेपाळला गेलेत - महाजन
महाराष्ट्रातून 45 आसनांच्या दोन बस नेपाळमध्ये गेल्यात - महाजन
सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पर्यटकांची माहिती घेण्यास सांगितले आहे - महाजन
27/8/2026 12:18:21
देशासाठी खेळणं म्हणजे देशाचे गौरव वाढवणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
खेळाडूच्या कामगिरीमुळे त्याच्या शहरालाही वेगळी ओळख मिळते
ऑलिम्पिकमधील अर्ध्याहून अधिक खेळांमध्ये भारताचे संघ नसतात
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं कमी प्रतिनिधित्व हे एक आव्हान
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान मोदी युवा खेळाडूंशी संवाद साधणार
27/8/2026 11:2:45
अमेरिकेत 18 वर्षाखालील युझर्ससाठी मेटाकडून नवे नियम जारी
फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरणाऱ्या 18 वर्षांखालील युझर्ससाठी नवीन नियम
किशोरवयीन मुलांना दिवसातून 2 तासच फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरता येणार
फेसबुक आणि इंस्टाग्राम रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार
अमेरिकेत झालेल्या 1.4 लाख कोटींच्या करारानंतर निर्णय
27/8/2026 10:30:45
अंड्यांच्या दरात 35 ते 40 टक्क्यांनी वाढ
कोंबड्यांचं खाद्य महागल्याने अंड्यांच्या दरात वाढ
किरकोळ बाजारात अंड्यासाठी 9 रुपये मोजावे लागणार
27/8/2026 10:26:25
बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील तक्रारदाराच्या कुटुंबावर हल्ला
महेंद्र देसलेंच्या माळीचमधील घरात मारहाण झाल्याचा आरोप
धुळ्यात शालार्थ आयडी प्रकरणातील तक्रारदारांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत
27/8/2026 10:0:53
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वे विस्कळीत
नाहूर ते भांडुप स्थानकादरम्यान लोकल थांबल्या
27/8/2026 10:0:13
अमित शहा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मणिपूरच्या दौऱ्यावर
वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी आणि इतर विकासकामांची पाहणी करणार
27/8/2026 9:21:13
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान मोदी युवा खेळाडूंशी संवाद साधणार
नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे खेळाडूंशी संवाद साधणार
देशातील 8 लाखांहून अधिक खेळाडूंशी मोदी संवाद साधणार
27/8/2026 9:16:17
पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा चेंबरमध्ये गुदमरून मजुरांचा मृत्यू
निगडीतील लोकमान्य रुग्णालयासमोरील चेंबरमध्ये गुदमरून दोन मुजारांचा मृत्यू
गेल्या वर्षी याच चेंबरमध्ये तीन मजुरांचा झाला होता मृत्यू
27/8/2026 8:5:10
समृद्धी महामार्गावरील बोगदा आज एक तास बंद राहणार
नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील बोगदा एक तासासाठी बंद राहणार
दुपारी 12 ते 1 या वेळेत बोगदा बंद राहणार
27/8/2026 8:1:3

