पाकिस्तानविरुद्ध तिलक वर्माचे अर्धशतक
भारताला विजयासाठी 91 चेंडूंत 137 धावांची गरज
22/11/2026 22:44:1
पुण्यातील कर्वेनगरमध्ये पीएमपीएल बसने एकाला चिरडलं
कर्वेनगर ब्रीजखालून पायी जाणाऱ्या व्यक्तीचा बसच्या धडकेने जागीच मृत्यू
पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल
22/11/2026 21:17:53
आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये पाकिस्तान संघ 313 धावांवर सर्वबाद
भारताकडून हर्षित राणा, प्रीन्स यादव, सुर्यांश हेडगे आणि विपराज निगम यांनी प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या
22/11/2026 19:29:54
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारत दौऱ्यावर
बालेन शाह दोन दिवसीय भारत दौऱ्यावर
बालेन शाह घेणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
सोमवारी पंतप्रधान मोदी आणि बालेश शाह यांच्यात होणार द्विपक्षीय चर्चा
22/11/2026 17:21:2
एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने
नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा फलंदाजीचा निर्णय
भारतीय संघात कोणताही बदल नाही
22/11/2026 15:25:3
धुळ्याच्या महापौरांचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
आमदार अनुप अग्रवाल यांच्या माहितीमुळे खळबळ
महापौर मायादेवी परदेशींकडून जीवन संपवण्याचा प्रयत्न
महापौर परदेशी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू
22/11/2026 14:1:46
सोलापुरात ऊस दराचा तिढा सुटला
ऊसासाठी बहुतांश कारखान्याकडू न 3450 रुपये दराला मान्यता
राजू शेट्टी आणि जयकुमार गोरे यांच्या चर्चेनंतर दराबाबत तोडगा निघाला
पहिला हप्ता 3250 रुपये तर उर्वरित 200 रुपये दोन टप्प्यात मिळणार
22/11/2026 12:22:55
पुण्यातील आठ हॉटेल्सचे परवाने एफडीएकडून निलंबित
हॉटेलच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता आढळल्याने कारवाई
पुण्यात एफडीएकडून 20 हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी
हॉटेल दरबार, महादेव फूड्स, फिरोज केटरर्सचा परवाना निलंबित
22/11/2026 11:48:18
ठाण्यातील रिक्षाचालकांचा 1 डिसेंबरपासून आंदोलनाचा इशारा
भाडेवाढीचा निर्णय न झाल्यास रिक्षाचालकांचा आंदोलनाचा इशारा
सीएनजीच्या दरवाढीमुळे चालकांकडून रिक्षा भाडेवाढीची मागणी
गेल्या 11 महिन्यांत सीएनजीच्या दरात तब्बल 11 रुपयांची वाढ
22/11/2026 11:45:45
किशोरी पेडणेकर यांनी घेतली संजय राऊतांची भेट
राऊतांच्या निवासस्थानी जाऊन पेडणेकरांनी घेतली भेट
22/11/2026 10:41:43
मुंबईत मर्सिडीज - बेंझ क्लासिक कार्सचे प्रदर्शन
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शुभारंभ
22/11/2026 10:18:27
भारतीय हवाई दलाचा नागपुरात विशेष एअर शो
एअरफेस्ट 2026 विशेष एअर शो ला सुरुवात
विशेष एअर शोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती
22/11/2026 10:14:0
मुंबईसह कोकणात तापमानाच्या पाऱ्यात घसरण
गेल्या 11 वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद
नाशिक, अकोला जिल्ह्यातही धुके
पुण्यातही तापमानाचा पारा घसरला
22/11/2026 9:44:14
डोंबिवलीत प्रियकराने लावली प्रेयसीच्या घराला आग
प्रेयसीच्या घराला आग लावणाऱ्या दीपेश रस्तोगीला पोलिसांकडून अटक
7 ते 8 वर्षांपासून आरोपी आणि तरुणीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती
22/11/2026 9:25:19
खाटू श्यामच्या दर्शनाला गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांवर काळाचा घाला
राजस्थानातील कोट्यात झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील 9 जणांचा मृत्यू
कोटा-उदयपूर हायवेवर शंभूपुरा गावाजवळ घडला भीषण अपघात
खाटू श्यामचे दर्शन करून घरी परतत असताना घडला अपघात
रविवारी मध्यरात्री घडलेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाल्याची माहिती
शंभूपुरा गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला भाविकांची क्रूझर व्हॅन धडकल्याने अपघात घडल्याची माहिती
राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
वडकुते यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास
आठ महिन्यापूर्वीच भाजपकडून रामराव वडकुते यांना देण्यात आली होती राज्यसभेची खासदारकी
वडकुते यांना छातीत दुखत असल्याकारणाने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यता आले होते.
राज्यातील धनगर समाजाचे नेतृत्व करणारे नेते म्हणून रामराव वडकुते यांची ओळख
22/11/2026 8:41:19
बारामती एमआयडीसीमध्ये उद्योजकाच्या गाडीवर गोळीबार
शिव शंभो नगरमधील उद्योजक राजन कोळेकर यांच्या गाडीवर गोळीबार
सुदैवाने गोळीबारात कोणतीही जीवितहानी नाही
कोळेकर यांच्या गाडीवर अज्ञातांकडून 2 राऊंड फायर
22/11/2026 8:41:19

