ठाकरेंच्या शिवसेनेचे कोल्हापुरात ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन
ठाकरेंच्या शिवसेनेकडून ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी
3/10/2026 12:28:6
मुंबईच्या माहिममध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली
पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया
पाईपलाईन नेमकी कधी फुटली, याची कोणतीही माहिती नाही
पाईपलाईन फुटल्यानंतरही महापालिकेचे पथक दुरुस्तीसाठी हजर नाही
3/10/2026 12:12:1
विरारमध्ये भाजप आणि बविआमध्ये तणाव
विरार स्पोर्ट्स क्लबच्या उद्घटनावरून तणाव
विरार स्पोर्ट्स क्लबच्या उद्घाटनासाठी भाजप कार्यकर्ते जमले
उद्घाटनाच्या श्रेयावरून भाजप आणि बविआमध्ये वाद
3/10/2026 12:5:34
सुषमा अंधारे पोहोचल्या प्रदीप पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला
सुषमा अंधारेंकडून पूर्णेकर कुटुंबीयांचे सांत्वन
3/10/2026 11:53:25
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत - पाकिस्तान क्रिकेट अंति सामना
प्रथम फलंदाजी करत भारताच्या 20 षटकांत 211 धावा
पाकिस्तानसमोर 212 धावांचे आव्हान
3/10/2026 11:51:58
प्रदीप पूर्णेकरांच्या हत्या प्रकरणी तपासाला वेग
पोलिसांकडून परिसरातील 100 हून अधिक सीसीटीव्हीची तपासणी
पूर्णेकरांचे नातेवाईक आणि जवळच्या मित्रांचेही जबाब नोंदवले गेले
घटनास्थळाजवळच्या दुकानदार, व्यापारी आणि प्रत्यक्षदर्शींची पोलिसांकडून चौकशी
हत्येमागील आर्थिक, राजकीय, वैयक्तिक वादांचाही तपास
3/10/2026 11:9:4
सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंवर गुन्हा दाखल
अभिजीत दिपकेंवर दादरमधील आंदोलनप्रकरणी गुन्हा दाखल
शिवाजी पार्क परिसरात विनापरवानगी आंदोलन केल्याने गुन्हा दाखल
3/10/2026 10:36:4
प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी आगरी समाज संघटना आक्रमक
आरोपींची नार्को टेस्ट करण्याची ठाकरे गट जिल्हा महिला संघटकाची मागणी
पूर्णेकरांच्या घरापासून कापूरबावडी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा
ठाण्यातील पाच आगरी समाज संघटना उद्या मोर्चा काढणार
3/10/2026 10:20:57
हिंगोली जिल्ह्यात सकाळपासून 2 वेळा भूकंपाचे धक्के
शहरात सकाळी 9 वाजून 43 मिनिटांनी जाणवला दुसरा भूकंपाचा धक्का
नांदेड शहरातही भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती
3/10/2026 10:7:15
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्णपदक
अमरावतीच्या 17 वर्षीय तिरंदाज कुमकुम मोहोडचा सुवर्ण कामगिरी
कुमकुम मोहोडने तिरंदाजीत मिळवले सुवर्णपदक
रिकर्व्ह वैयक्तिक तिरंदाजीत सुवर्णपदक मिळवणारी कुमकुम ठरली पहिली भारतीय महिला
3/10/2026 9:20:45
गोराई बीचवर घडली हिट अँड रनची घटना
थारची रिक्षाला धडक
थारची रिक्षाला धडक बसल्याने चार महिला गंभीर जखमी
पोलिसांकडून थार चालकावर गुन्हा दाखल
3/10/2026 9:15:24
आजही विद्यार्थी संघटनांची दिल्लीत आंदोलनाची हाक
जंतर मंतर मैदानावर विद्यार्थी नेत्या नेहा बोरांची आंदोलनाची हाक
काल आंदोलनादरम्यान पोलिसांकडून धरपकड
आंदोलकांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी
3/10/2026 9:5:8
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का
3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का
भूकंपामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
3/10/2026 9:0:47
राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेत्यांची बैठक
राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आज बैठक
ठाकरे बंधूंच्या उद्याच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठक
3/10/2026 8:54:46
ठाण्यात विरोधी पक्षांची आज पत्रकार परिषद
प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी आणि पुढील भूमिकेसंदर्भात पत्रकार परिषद
प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येमुळे ठाण्यातील राजकारण तापले
जितेंद्र आव्हाड, राजन विचारे, अविनाश जाधवांची आज एकत्रित पत्रकार परिषद
3/10/2026 8:39:52
शरद पवार आज बारामती, दौंडमधील दुष्काळाची पाहणी करणार
शरद पवार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार
पाझर तलाव, कॅनॉल संदर्भात सद्यस्थितीतील पाण्याचाही आढावा घेणार
काल पुरंदरमधील दुष्काळी भागाची पवारांनी पाहणी केली होती
3/10/2026 8:39:52

