संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 20 जुलैपासून सुरुवात
संसदेचे पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार
4/7/2026 20:8:3
मुसळधार पावसामुळे मुंबईच्या तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने
हार्बर मार्गावरील चुनाभट्टी स्थानकात पाणी
4/7/2026 19:36:40
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद
वैभव सूर्यवंशी 10 चेंडूंत 2 षटकारांच्या मदतीने 14 धावा करून बाद
4/7/2026 19:36:17
ठाणे स्थानकाजवळ लोकमध्ये महिलेची प्रसुती
टिटवाळा-सीएसएमटी लोकलमधील घटना
4/7/2026 17:52:56
वसईच्या भोईदापाडा येथे आलेल्या पुरात एक व्यक्ती वाहून गेला
नाल्याला आलेल्या पुरात 50 वर्षीय व्यक्ती गेले वाहून
4/7/2026 17:48:43
टीईटी पेपरफुटी प्रकरणी आणखी 3 जणांना अटक
नरेशकुमार महोरे, संजयकुमार चंद्रा आणि बाबूलाल कुशवाहा यांना आग्र्याहून अटक
आग्र्यातील महिम पत्रण कंपनीतून प्रश्नपत्रिका प्रिंट केल्याचा तिघांवर आरोप
4/7/2026 17:42:21
जुहू-वर्सोवा लिंक रोड खचला
कॉम्पॅक्टर कारची चाक अडकली खचलेल्या खड्ड्यात अडकली
4/7/2026 17:22:4
भर पावसात निवृत्तीनाथ महाराजांच्या पावखाची रिंगण सोहळा पार पडणार
सिन्नर तालुक्यातील दातली गावी पार पडणार रिंगण सोहळा
4/7/2026 17:21:47
मुंबईतील ताज हॉटेल परिसरात झाड पडले
झाड पडल्याने हॉटेलकडे जाणारा रस्ता बंद
प्रशासनाकडून कोसळलेले झाड बाजूला करण्याचे काम सुरू
4/7/2026 16:28:39
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत मुसळधार पाऊस
एकूण पाणीसाठी 9.41 टक्क्यांवर
तुळशी तलावात सर्वाधिक 150 मिमी पाऊस
विहार येथे 122 मिमी पावसाची नोंद
भातसा धरण परिसरात 72 मिमी पाऊस
मोडक सागर परिसरात 48 मिमी पाऊस
मध्य वैतरणा येथे 46 मिमी पाऊस
4/7/2026 16:22:27
सानपाडा रेल्वे भुयारी मार्गात गुडघाभर पाणी
पाणी साचल्याने सानपाडा भुयारी मार्ग बंद
भुयारी मार्गातील साचलेल्या पाण्यात कॅश वॅन अडकली
4/7/2026 15:30:21
मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच, समुद्रालाही उधाण
अरबी समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा
मरिन ड्राइव्हवर उंच लाटा पाहण्यासाठी गर्दी
मुंबईला आज आणि उद्या रेड अलर्ट
4/7/2026 14:56:1
कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडले
मुंबई ते गोवा जनशताब्दी तब्बल 2 तास उशिराने
भोके स्टेशनला जनशताब्दी जवळपास दीड तासांपासून होती थांबून
4/7/2026 13:48:0
भांडुपमध्ये रस्ता खचला
रस्ता खचल्याने एक टेम्पो थेट खड्ड्यात गेला
रस्त्याचे खोदकाम केल्याने रस्त्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती
4/7/2026 13:31:34
सायन - पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी
नवी मुंबईत पावसाचा धुडगूस सुरूच
नवी मुंबईतील शाळा, महाविद्यालयांनी सुट्टी जाहीर
सलग तिसऱ्या दिवशी नवी मुंबईत मुसळधार पाऊस
4/7/2026 13:17:19
पवईतील हिरानंदानी परिसरात झाड कोसळले
झाड कोसळून चार वाहनांचे मोठे नुकसान
4/7/2026 13:11:13
मुंबईत दुपारच्या सत्रातील शाळांना सुटी जाहीर
मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने घेण्यात आला निर्णय
आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे आवाहन
4/7/2026 12:53:37
चेंबूरच्या क्युबिक मॉलजवळ झाड कोसळले
झाड कोसळल्याने कारचे मोठे नुकसान
4/7/2026 12:41:28
सिंधुदुर्गच्या करूळ घाटात पुन्हा दरड कोसळली
मुसळधार पावसाचा करुळ घाटाला फटका
शनिवारी सकाळी पुन्हा दरड कोसळून वाहतुकीला फटका
शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घाटात दरड कोसळली होती
4/7/2026 12:14:51
मेट्रोची यलो लाईन सेवा पूर्णपणे ठप्प
मेट्रो सेवा बंद झाल्याने मुंबईकरांचे हाल
मुंबईतील मुसळधार पावसाचा मेट्रो सेवेला फटका
4/7/2026 12:4:57
मुंबई - दहिसर - अंधेरी मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड
मागील 10 मिनिटांपासून मेट्रोची वाहतूक विस्कळीत
मेट्रोच्या विस्कळीत वाहतुकीमुळे प्रवाशांना मनस्ताप
मेट्रोच्या मंडपेश्वर स्थानकावर बिघाड झाल्याची माहिती
4/7/2026 11:21:46
ठाण्यात खारेगाव नाक्यावर झाड कोसळले
झाड कोसळल्यामुळे 2 जण जखमी
दोन दुचाकीस्वार जखमी झाल्याची माहिती
4/7/2026 11:0:6
पुण्यात गेल्या 3 दिवसांत 70 हॉटेल्स, रेस्टॉरंटची तपासणी
तपासणीत 7 आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित
पुण्यातील 7 हॉटेल, रेस्टॉरंटवर एफडीएची कारवाई
PES इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेल कॅन्टीनचा परवाना निलंबित
4/7/2026 10:36:50
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत खालावली
अचानक प्रकृती बिघडल्याने शुक्रवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती
त्यांच्यावर सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू
शुक्रवारी विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना एकनाथ शिंदे यांना ताप आल्याची माहिती
4/7/2026 9:6:52
मुसळधार पावसामुळे विरारमध्ये जागोजागी साचले पाणी
विरार बस डेपो, बोळींज, विवा कॉलेज रोड परिसरात साचले पाणी
विरारमधील सखल भागात गुडघाभर पाणी
4/7/2026 9:4:32
मध्य रेल्वे लोकल सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने
पश्चिम मार्गावरील लोकल सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने
4/7/2026 8:57:18
दादर फुल मार्केटमध्ये वडाचे झाड कोसळले
मीनाताई ठाकरे फुल मार्केटमध्ये कोसळले झाड
झाड कोसळल्याने मार्केटचे मोठे नुकसान
शनिवारी मध्यरात्री 2.15 वाजताच्या सुमारास घडली घटना
4/7/2026 8:46:10
मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात पहाटेपासून पावसाने जोर धरला
मुंबईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळ्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
अंधेरी सब-वेमध्ये पाणी साचण्यास सुरुवात
4/7/2026 8:34:50
जोगेश्वरीत हिट अँड रनचा थरार
जोगेश्वरीत भरधाव टँकरची डिलिव्हरी बॉयला धडक
अपघातात डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाल्याची माहिती
टँकरचालक मद्यधुंद असल्याचा प्राथमिक दावा

