बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हीच्या ५१ व्या बर्थडे निमित्त बिजनेसमन ललित मोदी यांनी ,सोशल मीडियावर फोटोसह खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी माझी प्रिय मैत्रीण असा सुश्मिताचा उल्लेख केला असून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा सुश्मिता आणि ललित मोदी यांच्या रियुनियनच्या चर्चांना उधाण आले आहे.
मोदी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सु्श्मितासोबतचा जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला असून त्यावर सुश्मिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात मोदींनी म्हटले आहे की माझी सर्वात प्रिय मैत्रीण @sushmitasen47 हिला जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा-कायम हसत राहा..या पोस्टला सुश्मितानेही लाईक केले आहे. यामुळे या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून ते पुन्हा एकत्र आल्याचे हे संकेत असल्याचे म्हटले जात आहे.
ललित मोदी यांनी २०२२ साली सुश्मिता सेन बरोबरचे मालदिव आणि सार्डीनिया व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याचबरोबर सुश्मिता आपली बेटर हाफ असून आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात करतोय असे पोस्ट केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. तर काहींनी सुश्मिता आणि ललित मोदी यांच्या वयातील आणि श्रीमंतीमधील अंतर यावरून सुश्मिताला ट्रोल करण्यास सुरुवात केली. गोल्ड डिगर असे सुश्मिताबद्दल बोलले गेले. यावरून सुश्मिता आणि मोदी यांच्यात बराच तणाव निर्माण झाला. त्यानंतर दोघांनी आपले मार्ग बदलले. मोदींनी त्यांच्या सोशल मीडीया अकाऊंटवरून सुश्मिताबरोबरचे फोटोही हटवले . यामुळे दोघांचा ब्रेकअप झाल्याचे नेटकऱ्यांनीच जाहीर केले.
मात्र मधल्या काळात एका पॉडकास्टमध्ये ललित मोदी यांनी सुश्मिताचा उ्ललेख करत तिच्यामुळे मी घडलोय. ती एक सुंदर व सक्सेसफूल स्त्री असून तिचे हीऱ्यांचे स्टोअर असल्याचे मोदी यांनी म्हटले होते. तसेच आम्ही बाहेर गेल्यावर तिच सगळा खर्च करत असल्याचे सांगत ती कोणावरही अवलंबून नाही असेही मोदी यांनी सांगितले होते.

