Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Makeup Expiry: मेकअप प्रॉडक्ट्स किती महिन्यांनी बदलावे?

Makeup Expiry: मेकअप प्रॉडक्ट्स किती महिन्यांनी बदलावे?

हागडी लिपस्टिक, आवडता मस्कारा किंवा रोज वापरलं जाणारं फाउंडेशन अनेक महिला मेकअप प्रॉडक्ट्स पूर्ण संपेपर्यंत वापरत राहतात. पण प्रत्येक कॉस्मेटिक प्रॉडक्टची एक ठरावीक 'शेल्फ लाईफ' असते.

एक्सपायरीनंतर ते वापरल्यास त्वचेवर पुरळ, खाज, डोळ्यांचे इन्फेक्शन, पिंपल्स किंवा अॅलर्जीचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मेकअप खरेदी करताना जितकं महत्त्व ब्रँडला देता, तितकंच त्याच्या वापराच्या कालावधीकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.

मेकअप प्रोडक्ट्सची शेल्फ लाईफ
साधारणपणे मस्कारा 3 ते 6 महिन्यांनी बदलणे योग्य मानले जाते. तो वारंवार डोळ्यांच्या संपर्कात येत असल्याने त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते. लिक्विड आयलाइनर सहा महिन्यांपर्यंत वापरता येतो. फाउंडेशन आणि कन्सीलर 12 ते 18 महिने, तर लिपस्टिक 18 ते 24 महिने सुरक्षित मानली जाते. कॉम्पॅक्ट किंवा पावडर दोन वर्षांपर्यंत टिकू शकते. याशिवाय मेकअप ब्रश आठवड्यातून किमान एकदा धुणे आणि ब्युटी ब्लेंडर तीन ते सहा महिन्यांनी बदलणेही तितकेच महत्वाचे आहे.

मुदत ओळखण्याची सोपी पद्धत
प्रॉडक्टच्या पाठीमागे लहान उघड्या डब्याचे चिन्ह असते, ज्यावर 12M किंवा 6M (महिने) असे लिहिलेले असते. याचा अर्थ ते उघडल्यानंतर पुढे तितके महिने वापरता येते. जर प्रॉडक्टचा रंग, वास किंवा टेक्स्चर बदललं असेल, तेल वेगळं दिसत असेल किंवा वापरताना त्वचेवर जळजळ होत असेल, तर ते लगेच वापरणं थांबवा. अनेकदा एक्सपायरी डेट निघून गेलेली नसली तरी चुकीच्या पद्धतीने स्टोअर केल्यामुळे प्रॉडक्ट खराब होऊ शकतो. त्यामुळे वेळोवेळी आपल्या मेकअप किटची तपासणी करा आणि गरजेनुसार जुने प्रॉडक्ट्स बदलण्याची सवय लावा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar